Viral Video Of Vrindavan Monkey : सोशल मीडियावर प्राण्यांना संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक प्राण्यांमधील झुंज, त्यांचा मानवी वस्तीत होणारा शिरकाव, प्राणी आणि माणसांमधले अनोखे नाते याचे दर्शन होत असते. याचबरोबर माकडांनी गोंधळ घातल्याच्या अनेक घटनाही तुम्ही पहिल्याच असतील. व्हिडीओत माकडांचा खोडकर स्वभाव दिसून येतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये माकडांचा खोडकरपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे.

व्हायरल व्हिडीओ वृंदावनचा आहे. वृंदावनची माकडे भक्तांच्या वैयक्तिक वस्तू, विशेषतः चष्मा हिसकावून घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे सर्व चांगल्या प्रकारे जाणून सुद्धा कन्टेन्ट क्रिएटर चंद्र दर्शन वाटले की, तो माकडांची शाळा घेऊ शकतो. त्यामुळे माकडांनी चष्मा चोरण्याऐवजी त्याने स्वतःहून माकडाला चष्मा द्यायला गेला. पण, माकड शेवटी माकड असते. त्यांनी चंद्रकडे दुर्लक्ष केले. एक माकड आळशीपणे बसले होते तर दुसरे इकडे-तिकडे पाहत होते. त्यानंतर मग चंद्र रील शूट करण्यास सुरुवात करू लागला.

नियम म्हणजे नियम (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, सुरवातीला चंद्र माकडांना स्वतःहून चष्मा द्यायला गेला. पण, माकडांनी दुर्लक्ष केले. मग हे पाहून चंद्र स्वतःचा रील शूट करण्यास सुरुवात करू लागला. पण, इथे मात्र एक ट्विस्ट आला. चंद्र चष्मा डोळ्यावर ठेवून ठेवून कॅमेऱ्यासमोर पोज देत होता तितक्यात एक माकड वरून खाली उडी मारतो आणि चष्मा हिसकावून निघून जातो आणि गपचूप आपल्या जागेवर बसतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @chandra_darsan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “नियम प्रत्येकासाठी सारखाच असतो, ज्याप्रकारे चष्मा इतरांकडून घेतला जातो. त्याप्रमाणेच माझ्याकडून पण घेतला गेला ” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तर नेटकरी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत आणि “दादा नियम प्रत्येकासाठी सारखाच असतो, “आम्ही फुकट नाही मेहनतीने घेतो”, “नियम म्हणजे नियम” ; आदी अनेक मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.