scorecardresearch

Viral Video: आयफेल टॉवरसमोर साडी नेसून महिलांनी केला गंगुबाई काठियावाडीतील गाण्यावर भन्नाट डान्स!

आतापर्यंत या व्हिडीओला १३,००० व्ह्यूज मिळाले आहेत.

Gangugabi Kathiawadi song
व्हायरल व्हिडीओ (फोटो: mansi_dancetodream / Insatgram)

आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. चित्रपटातील ढोलिडा गाण्याची क्रेझ तर दिवसेंदिवस वाढतच आहे. या गाण्यावर गाणे लोक नाचत रील बनवताना दिसतात. इंस्टाग्राम युजर मानसी पारेखने आयफेल टॉवरसमोर ढोलिडा गाण्यावर तिच्या मैत्रिणींसोबत नाचतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जप आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, मानसी पारेख दोन मैत्रिणींसह पॅरिसच्या आयफेल टॉवरसमोर साडी आणि स्नीकर्स घालून नाचताना दिसत आहेत. या तिघी ढोलिडा गाण्याच्या हुक स्टेपवर डान्स करत आहेत. व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “एक गई गंगूबाई ” असे लिहिले आहे.

(हे ही वाचा: शिकार करण्यासाठी चित्त्याने घेतली हरणावर झेप पण…; बघा Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ फेब्रुवारीमध्ये अपलोड करण्यात आला होता आणि त्याला आतापर्यंत १३,००० व्ह्यूज मिळाले आहेत. नेटीझन्सने व्हिडीओवर अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबांनंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)

(हे ही वाचा: Viral Photo: व्हायरल झालेल्या ‘या’ फोटोतला दुसरा बिबट्या तुम्ही शोधू शकता का?)

गंगुबाई काठियावाडी गेल्या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. संजय लीला भसाळी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, शंतनू माहेश्वरी, सीमा पाहवा आणि जिम सरभ यांच्याही भूमिका आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video women wearing sari in front of eiffel tower dance on gangubai kathiawadi song ttg

ताज्या बातम्या