IRCTC Jewels of Kashmir Package: भारतामध्ये मार्च-एप्रिलपासून खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरु होतो. वर्षातला सर्वात उष्ण महिना म्हणजे मे. पुढे जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्येही आपल्याकडे उकडत असतं. त्यानंतर उन्हाळा संपून जुलै महिन्यापासून पावसाळ्याला सुरुवात होते. मे-जून महिन्यामध्ये उन्हाचा सर्वात जास्त त्रास होत असतो. अशा वेळी लोक थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन बनवत असतात. जर तुम्ही थंड हवामान असलेल्या जागी फिरण्याचा विचार करत असाल, तर IRCTC च्या ‘ज्वेल्स ऑफ काश्मीर’ (Jewels of Kashmir) या टूर पॅकेजची निवड करु शकता.

काश्मीरला ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे म्हटले जाते. आयुष्यामध्ये एकदातरी काश्मीर फिरायची संधी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. ही इच्छा भारतीय रेल्वेच्या IRCTC टूर पॅकेजच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. या पॅकेजमध्ये प्रवाश्यांना जन्नत-ए-काश्मीर पाहण्याची संधी मिळेल. ही टूर सहा दिवसांची असणार आहे. चंदीगड येथून ज्वेल ऑफ काश्मीर टूरची सुरुवात १७ जून रोजी होणार आहे. या टूरमध्ये हवाई प्रवासदेखील करता येणार आहे. गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर आणि सोनमर्ग या जागांचा समावेश टूर पॅकेजमध्ये करण्यात आला आहे.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त

IRCTC काश्मीर टूर पॅकेजची सविस्तर माहिती

टूरची सुरुवात चंदीगडपासून होईल. प्रत्येक प्रवाश्याला चंदीगडहून श्रीनगरला विमानाने नेले जाईल. तेथे पोहचल्यावर हॉटेलमध्ये आराम करण्यासाठी नेले जाईल. तेथून संध्याकाळी शिकारा बोटीतून चार चिनार दल तलाव फिरु शकता. तलाव पाहून झाल्यानंतर हॉटेलमध्ये परत नेले जाईल. हॉटेलमध्येच जेवणाची सोय असेल. दुसऱ्या दिवशी अन्य प्रवाश्यासह सोनमर्गला जाण्यासाठी श्रीनगरहून निघण्याची सोय केली जाईल. तेथे Thajwas Glacier हे प्रमुख आकर्षण आहे. पर्यटनादरम्यान ही जागा पाहावी. तिसऱ्या दिवशी गुलमर्ग आणि चौथ्या दिवशी पहलगामला नेले जाईल.

पहलगाम फिरुन झाल्यानंतर रात्री राहण्याची सोय केली जाईल. पाचव्या दिवशी पहलगामहून श्रीनगर असा प्रवास करावा लागेल. श्रीनगर फिरताना शंकराचार्य मंदिर आणि हजरतबल दर्गा या ठिकाणांना भेट द्यायला विसरु नका. फिरुन झाल्यावर रात्री हाऊसबोटमध्ये राहण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यात येईल. सहाव्या दिवशी सकाळी नाश्ता करुन श्रीनगरवरुन विमानाने पुन्हा चंदीगडला सोडण्यात येईल.

Extra Motivation! कुत्र्याच्या लहान पिल्लासह ममता बॅनर्जींनी केला ट्रेडमिलवर व्यायाम, व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Jewels of Kashmir टूर पॅकेजला होणार खर्च

या टूरमध्ये एक व्यक्ती सहभागी होत असेल, तर त्याला ३४,६७० रुपये भरावे लागतील. जर २ प्रवासी टूरचा लाभ घेणार असतील, तर त्यांना प्रत्येकी २९,९७० रुपये खर्च येईल. तिघाजणांसाठी खर्चाची रक्कम २८,६१० रुपये होईल. म्हणजेच त्या तिघांपैकी प्रत्येकाला २८,६१० रुपये भरावे लागतील. लहान मुलांसह बेड शेअर करायचा असल्यास २०,१९० रुपयांचे शुल्क आकारले जाईल.

(टीप – IRCTC च्या या टूर पॅकेजची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवरुन मिळवू शकता.)