दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ प्राण्यांचे असतात. प्राण्यांचे गोंडस हावभाव कैद करणारे, तर काही त्यांचे थक्क करणारे रूप दाखवणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन पोपट झाडाच्या खोडामध्ये घरटे बनवत असल्याचे दिसत आहे. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Zomato डिलीवरी बॉयने भररस्त्यातच सुरू केला डान्स; नेटकऱ्यांनी केली चिंता व्यक्त, म्हणाले ‘आम्हाला वाटले…’

हा व्हिडीओ शेअर करत सुशांत नंदा यांनी एक मोलाचा संदेश दिला आहे. ‘पोपटांची ही जोडी नव्या घरात राहायला जाण्यासाठी, गृहप्रवेशाची तयारी करत आहे. यामुळे वृक्षतोड का करू नये याचे आणखी एक कारण स्पष्ट होते’ असे कॅप्शन सुशांत नंदा यांनी दिले आहे. झाडांवर पक्षी, कीटक अशा प्राण्यांचे वास्तव्य असते, त्यामुळे जेव्हा वृक्षतोड केली जाते, तेव्हा या सर्व प्राण्यांचे घर हिरावून घेतले जाते, त्यामुळे त्यांना दुसरीकडे नवे घर शोधावे लागते. म्हणून झाडं तोडू नयेत, असा मोलाचा संदेश या व्हिडीओमधून देण्यात येत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch this cute video of two parrots entering their new home is going viral and also has a valuable message pns
First published on: 12-11-2022 at 16:47 IST