Funny Slogan Written Behind Car Video Viral : रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॅक तर हल्ली कारमागेही असे काही भन्नाट कोट्स लिहिलेले असतात की, वाचून खूप हसायला येते. त्यात काही कोट्स हे इतके विचारपूर्वक लिहिलेले असतात की ते वाचून आपणही विचारात पडतो. त्यामुळे वाहनांवरील हे कोट्स अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एका कारचालकाने त्याच्या कारच्या मागे इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले पॅनल लावला आहे. याच पॅनलमध्ये एक अशी सूचना लिहिली आहे की, जी वाचून तुम्हीही म्हणाल की, याला म्हणतात बायकोचा धाक. तर अनेकांना ही सूचना वाचून हसू आवरणे अवघड झाले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या कारचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

पठ्ठ्याने शोधली भन्नाट आयडिया

तुम्हाला माहीतच आहे की, रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनाला जराही धक्का लागला किंवा चुकूनही कोण घासून गेले तरी तेथे हाणामारीचा प्रसंग उदभवतो. चालक एकमेकांच्या अक्षरश: जीवावर उठतात. रागाच्या भरात ते एकमेकांना शिवीगाळ करत हात उचलतात. असे व्हिडीओ रोज सोशल मीडियावरही पाहायला मिळतात. हाच प्रकार रोखण्यासाठी व्हिडीओतील एका पठ्ठ्याने एक भन्नाट आयडिया शोधली आहे.

चालक असण्याबरोबरचे त्याने एक नवरा म्हणून इतर चालकांना अनोखी विनंती केली आहे. त्यासाठी त्याने कारच्या मागील काचेवर एक डिजिटल बोर्ड लावला आहे, ज्यावर अशी काही सूचना लिहिली आहे की, ती वाचून लोक खूप हसतायत. तर अनेक जण कमेंटद्वारे मजेशीर प्रतिक्रिया देतायत.

व्हायरल व्हिडीओत तुम्हीही पाहू शकता की, ट्रॅफिकमध्ये एक कार उभी आहे, जिच्या मागील काचेवर एक इलेक्ट्रॉनिक डिस्ल्पे पॅनल लावले आहे. ज्यावर सर्वप्रथम, “कृपया अंतर ठेवा, अंतर ठेवा” असे लिहिल्याचे दिसून येते. त्यानंतर पुढे, “कारला धक्का लागला, तर बायको मला मारेल”, असे लिहिलेले दिसते. याच वाक्याच्या शेवटी रडतानाचा एक इमोजी वापरला गेला आहे. त्यामुळे या चालकावर बायकोचा किती धाक आहे हे दिसून येते. अनेकांनी चालकाची ही विनंती अतिशय बोलकी असल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारचा हा मजेशीर व्हिडीओ @trippi_twenty या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, या भावाला आज मार खावा लागला आहे वाटतं. दरम्यान, हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांना पाहिला, तर हजारो युजर्सनी त्यावर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्यात. एका युजरने लिहिले की, भय इथले संपत नाही; पण हे चांगले आहे. दुसऱ्याने लिहिले की, नंबर प्लेट कमाल आहे. तिसऱ्याने लिहिले की, ब्ल्यू ड्रम तयार ठेवला आहे वाटतं. तर काहींनी मिश्कील सवाल केलाय की, काय भावा, हुंड्यात मिळालेली कार आहे वाटतं?