१३ डिसेंबरला २१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय सौंदर्यवतींच्या डोक्यावर विश्व सौंदर्याचा मुकुट सजला. हरनाज कौर संधू भारताची तिसरी मिस युनिव्हर्स बनली. सर्वांनी हरनाज कौर संधूचे अभिनंदन केले. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी हरनाजसोबत सेल्फी पोस्ट करून तिचे अभिनंदन केले. थरूर यांनी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच यूजर्सनी विचित्र प्रतिक्रिया दिल्या.

काय आहे पोस्ट?

शशी थरूर यांनी ट्विट केले की, “मिस युनिव्हर्स हरनाझ संधूचे जिंकून भारतात परतल्याबद्दल अभिनंदन करताना आनंद होत आहे. नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी भारतात परतण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत. निःसंशयपणे, त्यांचे स्वागत करताना भारताला अभिमान वाटतो. ती स्टेजवर होती तशी सभेतही ती मोहक दिसत होती.”

( हे ही वाचा: देसी जुगाड! शेतकऱ्याने भंगारातून बनवली अशी गाडी की त्यापुढे मोठे इंजीनियरही होतील फेल; बघा Viral Video )

नेटीझन्सने थरूर यांना केले ट्रोल

यानंतर अनेकांनी थरूर यांना ट्रोल करायला सुरुवात. एका युजरने लिहिले की सर कृपया ग्रुप कॅप्टन वरुण सिंगसाठी एक मेसेज करा. दुसर्‍या युजरने ट्विट केले की, शशी थरूर यांनी रामानुजन पुरस्कार जिंकणाऱ्या गणितज्ञ नीना गुप्ता यांचे अभिनंदन केले? तिसरे युजर म्हणाले की, तुम्हीही राजकारणाचा रणबीर कपूर आहात.

( हे ही वाचा: नवरदेवाच्या संतापलेल्या भावाने विवाह सोहळ्यात वहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद)

( हे ही वाचा: १८ वर्षांनंतर राहू मेष राशीत करेल प्रवेश , ‘या’ ४ राशीच्या लोकांच्या जीवनात आणेल आनंद आणि समृद्धी )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिस युनिव्हर्सचा इतिहास

२०२१च्या आधी ही पदवी १९९४ मध्ये सुष्मिता सेन आणि २००० मध्ये लारा दत्ताला देण्यात आली होती, ही गोष्ट अनेकांना माहिती आहे. या नावांशी आपण चांगलेच परिचित आहोत पण फॅशनच्या क्षेत्रात जगातील सर्वात मोठ्या मंचावर भारतालाच नव्हे तर आशियाला ओळख मिळवून देणारी कोणती सौंदर्यवती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू. १९६६ मध्ये मिस वर्ल्डसारख्या मंचावरून भारताला जिंकवणारी सुंदरी म्हणजे रीता फारिया.