विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी (३ मे) कणकवलीमध्ये सभा पार पडली. त्यानंतर आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. चिपळूणमध्ये त्यांची जाहीर सभा पार पडत आहे. दरम्यान आज राज ठाकरे यांची देखील कोकणात सभा आहे. नारायण राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची सभा होणार आहे.