देशातली महागाई कमी होत आहे, असा दावा करीत उत्पादनवाढीला बळ देत थेट परकीय गुंतवणुकीचे नियम शिथिल केल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आता नवीन वळण घेत असून गुंतवणूकदारांचा विश्वासही वाढत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी येथे सांगितले.
सरकारच्या कारकिर्दीस १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर जेटली यांनी आर्थिक आघाडीसंबंधी मतप्रदर्शन केले. देशातील उत्पादनाचा आलेख  बदलत असून सेवा क्षेत्रही सुधारत आहे.  उपाययोजनांमुळे येत्या काही महिन्यांमध्ये  विकासाच्या दरात चांगली वाढ होऊन सरकारने केलेल्या उपाययोजनांचे परिणाम दिसून येतील, असा विश्वास व्यक्त केला.