News Flash

लक्ष्यपूर्ती!

नुकतंच ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या फेसबुक पेजने एक लाख वाचकांच्या पसंतीचा टप्पा पार केला.

महत्त्वाच्या घडामोडी, विविध क्षेत्र, व्यक्ती, संस्था आणि उपक्रमांचे वेगळे पलू समोर आणणारे साप्ताहिक म्हणून ‘लोकप्रभा’ गेली चार दशकं मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. काळासोबत चालणाऱ्या या नियतकालिकाने केवळ आपल्या आंतरबा रूपात बदल केला नाही, तर भविष्याची पावले ओळखून समाजमाध्यमांनाही आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडले आहे. नुकतंच ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या फेसबुक पेजने एक लाख वाचकांच्या पसंतीचा टप्पा पार केला. नियतकालिकांचे वाचक कमी होत आहेत, अशी चर्चा होत असण्याच्या काळात हा पल्ला पार करणारं ‘लोकप्रभा’ हे एकमेव मराठी साप्ताहिक ठरलं आहे. ‘लोकप्रभा’ला हा बहुमान प्राप्त करून दिल्याबद्दल सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार. केवळ आकडेवारी नाही, तर दर्जेदार मजकुराच्याच माध्यमातून वाचकांना स्वत:सोबत बांधून ठेवण्यातही ‘लोकप्रभा’ यशस्वी झाले आहे. त्यामुळेच फेसबुक पेजवरून लेख वाचणे, ते इतरांसोबत शेअर करणे आणि त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांचा आकडा हा एकूण लाइक्सच्या सत्तर टक्के आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पेजवरील पासष्ट टक्क्यांहून अधिक वाचक हे १८ ते ३५ या वयोगटातील आहेत. केवळ मुंबई किंवा पुणे नाही, तर औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पंढरपूर, चंद्रपूर, सातारा, अमरावती, नांदेड, परभणी, जालना, धुळे, अकोला, जळगाव या जिल्ह्यंमधून वाचकांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्राबाहेरील नवी दिल्ली, जयपूर, सुरत, पटना, इंदौर, भोपाळ येथील मराठी वाचकांनीही ‘लोकप्रभा’ला पसंती दर्शवली आहे. अमेरिका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, सौदी अरेबिया, मलेशिया, इजिप्त, मेक्सिको, कॅनडा, इटली, दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम या देशांमध्ये स्थायिक झालेली मराठी मंडळीही ‘लोकप्रभा’ फेसबुक पेजशी जोडली गेली आहेत.

‘लोकप्रभा’मधील मथितार्थ, औषधाविना उपचार, फॅशन पॅशन, कलाजाणीव, सेकंड इनिंग, संख्याशास्त्र, सहकार जागर, सेलिब्रिटी लेखक, सिनेमा, टीव्हीचा पंचनामा, दखल, प्रेमाचे प्रयोग, पुस्तकाचे पान, स्मार्ट कुकिंग, पोटपूजा, ट्रेकर ब्लॉगर, पर्यटन या सर्व सदरांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. तरुणांसाठी तरुण लिहीत असलेल्या ‘युथफुल’ या विभागातील सर्व लेखांना वाचकांची चांगलीच पसंती मिळत असून विविध विषयांशी निगडित प्रसिद्ध झालेल्या लेखांवर तरुणांच्या आलेल्या प्रतिक्रिया उल्लेखनीय असतात. वाचकलेखक, ब्लॉगर कट्टा, कथा या वाचकांसाठी असलेल्या विभागांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्राच्याच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यातून वाचक आपलं लिखाण या सदरांसाठी पाठवत असतात.

तुमचे प्रेम हे असेच उत्तरोत्तर वाढत राहो, हीच सदिच्छा!

www.facebook.com/Lokprabha ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाचे ट्विटर हॅन्डलही (www.twitter.com/Lokprabha) असून ताज्या घडामोडी आणि अंकातील सर्व लेख वाचण्यासाठी, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता.
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:32 am

Web Title: lokprabha facebook page
टॅग : Facebook,Lokprabha
Next Stories
1 मराठीचे इंग्रजीकरण
2 मराठीचे मारेकरी!
3 ऑस्कर : आडाख्यांना तडाख्याचे वर्ष!
Just Now!
X