जिल्ह्य़ातील सुमारे २७ ग्रामसेवकांनी लेखापरीक्षकांना हिशेबाची कागदपत्रे दाखविली नाहीत. २००७ ते २०१२ या कालावधीतील हिशेबाची कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशा तोंडी व लेखी सूचना देऊनही हिशेब देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हिंगोली तालुक्यातील बळसोड, चोरजवळा बोरी, गाडी बोरी, कनका, कानडखेडा, देवठाणा, अंधारवार, काळकोंडी, वरुड गवळी, दुर्ग सावंगी, वडद, सावरखेडा, रोहोली (खु.), वऱ्हाडी, वसमत तालुक्यातील हिरडगाव, हयातनगर, टेंभुर्णी, पिंपळगाव, गिवरा (खु.) पांगरा बोखारे, कानोसा हट्टा, तसेच कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल, भुरक्याची वाडी, जवळा पांचाळ, चुंचा या एकूण २७ गावांच्या ग्रामसेवकांवर अभिलेखे लेखापरीक्षणात उपलब्ध करून न दिल्यास शिस्तभंग किंवा दफ्तर गहाळ केल्याचे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.