मुंब््रयातील रौफ, जे. के. कन्स्ट्रक्शन, नईम खान, चाँद इनामदार, दिनेश किणे, मनोहर किणे अशी काही परिचित नावे बेकायदा बांधकामे करण्यात आघाडीवर असून अशा बिल्डरांकडून घर खरेदी का नका, असे आवाहन महापालिकेने केले आहे. या यादीतील काही नावे राजकीय नेत्यांशी संबंधित असून अशा व्यक्तींमार्फत होत असलेल्या बांधकामांना राजकीय संरक्षण असते हे यापूर्वीच उघड झाले आहे. ही यादी प्रसिद्ध करताना सदर व्यक्तींमार्फत सुरू असलेल्या बांधकामांची सद्यस्थिती अहवालही महापालिकेने जाहीर केला असून त्यापैकी काही बांधकामे अद्यापही सुरू असल्याची धक्कादायक माहिती उघड होत आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या ही बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई लवकर उरकणे आवश्यक आहे. या यादीतील काही बांधकामांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असली तरी काही बांधकामांचे इमले मात्र अजूनही उभे राहात असल्याचे चित्र आहे. कळव्यात शासकीय जमिनींवर चाळी उभारण्याचे उद्योगही सुरूच आहेत. या ठिकाणी काही भागात खारफुटींची कत्तलही अद्याप थांबलेली नाही.

  tender procedure starts for development of gavlidev area in ghansoli
ghansoli, tender procedure, development work, sagar naik

घणसोलीतील दुर्लक्षित गवळीदेवाच्या विकासाचा मुहूर्त सापडला
० निविदा प्रक्रिया सुरू
० डोंगरावर वनराई फुलणार
० देवळाची नव्याने उभारणी
पर्यटनस्थळाच्या धर्तीवर विकास
प्रतिनिधी, नवी मुंबई
वर्षांनुवर्षे केवळ कागदावर राहिलेल्या ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील घणसोली येथील गवळी देव या पुरातन देवस्थानाचा विकास पर्यटनस्थळाच्या धर्तीवर करण्याच्या प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून गवळी देव डोंगर पर्यटनस्थळाच्या विकासाचा प्रस्ताव महापौर सागर नाईक यांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजाचे श्रद्धास्थान म्हणून गवळीदेव डोंगराकडे पाहिले जाते. या डोंगराचा विकास पर्यटनस्थळाच्या धर्तीवर करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
घणसोली विभागातील औद्योगिक क्षेत्रात गवळी देव हे पुरातन देवस्थान वसलेले आहे. या सगळ्या परिसराची वर्षांनुवर्षे वाताहत झाली असली तरी या भागातील रहिवाशांसाठी या डोंगराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हजारो संख्येने पर्यटक या डोंगराला भेट देतात आणि तेथील गवळीदेवाचे दर्शन घेतात. पर्यटनाच्या माध्यमातून श्रद्धेला मोकळी वाट करून देण्याची संधी मिळत असल्याने या सर्व परिसराचा विकास व्हावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थ वर्षांनुवर्षे करीत आहेत. या देवस्थानाचा परिसर हा वनखात्याच्या अखत्यारीत असून यापूर्वी या भागात नोसिल कंपनीमार्फत मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. नोसिल कंपनीत मोठय़ा प्रमाणावर रासायनिक उत्पादन निघत असे. त्यामुळे कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणावर उपाय म्हणून कंपनीमार्फत या सर्व भागात वृक्षारोपण करण्यात आले होते. नोसिल कंपनी बंद पडल्यावर मात्र या वनराईकडे दुर्लक्ष झाले. या भागात मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. त्यामुळे गवळीदेव डोंगराची अवस्था अत्यंत वाईट आहे. हा सर्व परिसर वनखात्याच्या अखत्यारीत असून महापालिकेने या डोंगराचा विकास करण्यासाठी वनखात्याची विशेष परवानगी घेतली आहे.
दरम्यान, गवळी देव डोंगराचा विकास पर्यटनस्थळाच्या धर्तीवर करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने तब्बल अडीच वर्षांपूर्वी नवी मुंबई महापौर सागर नाईक यांच्याकडे सादर केला होता. मात्र, महापौरांनी हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या मंजुरीसाठी आणला नाही. त्यामुळे गवळीदेव डोंगराचा विकास रखडला होता. अखेर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर गवळीदेव डोंगराच्या विकासाला मुहूर्त सापडला असून यासंबंधीच्या सविस्तर प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. गवळीदेव डोंगराच्या विकासासाठी अर्थसंकल्पात कोटय़वधी रुपयांची तरतूद करण्यात आली असून निविदा प्रक्रियाही लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेतील सभागृह नेते अनंत सुतार यांनी वृत्तान्तला दिली. गवळीदेव परिसरात पर्यटकांसाठी पदपथ, रेलिंगचे काम करण्यात येणार असून या ठिकाणी तलाव विकसित करणे, विहिरीची दुरुस्ती करणे, बाबूंच्या झोपडय़ा बांधणीची कामे केली जाणार आहेत. पर्यटकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली जाणार असून या सर्व कामांसाठी चार कोटी रुपयांची निविदा काढण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेले देवस्थान हे संरक्षित नाही. त्यामुळे देवस्थानाच्या ठिकाणी लहान स्वरूपाचे मंदिर उभारण्याचा प्रस्ताव आहे. या डोंगरावरील वनराई संरक्षित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.