येथील जय प्रभू मित्रमंडळाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्यांना समाजगौरव पुरस्कार व गुणवंत युवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी गुणवंत विद्यार्थी व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
जेलरोड येथील नाशिक सोशल सव्‍‌र्हिसेस सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या कामगार संघटनेचे सरचिटणीस रामभाऊ जगताप व अध्यक्षस्थानी आरंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज उपस्थित होते. जगताप यांनी मुलांना आई-वडिलांकडून पैसा व शिक्षणापेक्षा चांगले संस्कार मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रसाद देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल सेंट विन्सेट दि पॉल सोसायटी, संत आन्ना महामंदिर, अविनाश वाघ, जोसेफ सल्सी, विजया ठाकूर, डॉ. सुनील यार्दी, कार्लस कसबे, अ‍ॅड. सिस्टर क्लेरा गोन्सालविस, डॉ. अश्विन पारखे तसेच गुणवंत युवा म्हणून अर्चना कदम, सागर भालेराव यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ४० विद्यार्थ्यांना पारितोषिक   देऊन    सन्मानित    करण्यात    आले.
याप्रसंगी संचालक फादर सुरेश साठे, लॉरेन्स शिरसाठ व संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सिस ब्रिंगेजा उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तुळशीदास इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. जोसेफ ब्राह्मणे यांनी आभार मानले.