तरुणांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यात उत्साह दिसून आला, सोबतच आपण मतदान केल्याचे आपल्या मित्रमैत्री, नातेवाईकांना कळावे म्हणून सेल्फी काढून लगेच फेसबुक आणि एमएमएस पाठविण्यातही उत्साह दिसून आला.
स्मार्ट फोनमुळे सेल्फीचे (स्वतचे फोटो स्वतच घेणे) फॅड तरुणाईत आहे. त्याचा प्रत्यय मतदान केंद्रावरही आला. शहरात सुमारे एक लाख ३४ हजार मतदार १८ ते २० वयोगटातील आहेत. या नवमतदारांना मतदान करण्याची ही पहिलीच संधी होती. ते आपल्या मित्रासह कानात ईअरफोन आणि हातात भ्रमणध्वनी घेऊन मतदान केंद्रावर येत होते. पहिल्यांदाच मतदान असल्याने उत्साह ओसंडून वाहत होता. या उत्साहाच्या भरात आपण मतदान प्रक्रियेचे नियम मोडत आहोत, याची कल्पना देखील त्यांना नव्हती. उंटखाना येथील प्राथमिक शाळेत एक युवक भ्रमणध्वनीसह मतदान कक्षात प्रवेश गेला आणि मतदान केल्यावर सेल्फी केले. अशाच प्रकार अनेक मतदान केंद्रावर घडल्याचे दिसून येते. मतदान केल्याचे दाखविण्यासाठी अनेक तरुणांनी सेल्फी फेसबुक अपलोड केले आहे. मतदान कक्षात छायाचित्र घेण्यास मनाई आहे. मात्र निवडणूक कर्मचाऱ्यांना नियमांबद्दल अज्ञान आणि ज्यांना नियमांची माहिती असते. त्यांनी मतदारांची गर्दी बघता अशाप्रकारांकडे केलेला दुर्लक्ष सेल्फी आळा घालू शकला नसल्याचे लोकसभेप्रमाणे यावेळी देखील दिसून आले.
तसाच प्रकारे सेलिब्रिटिंच्या बाबत झाल्याचे दिसून येतो. सेलिब्रिटिंगचे छायाचित्र मतदान कक्षात जाऊन घेतले जात असल्याचे आढळून आले. शहरातील अनेक उमेदवार आणि राजकीय पुढाऱ्यांनी सकाळीच मतदान केले. अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावला आणि मतदान केंद्राच्या आवारात छायाचित्र काढले आणि लगेच फेसबुकवर टाकले गेले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2014 रोजी प्रकाशित
सेल्फी अन् मतदानाचा हक्क
तरुणांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यात उत्साह दिसून आला, सोबतच आपण मतदान केल्याचे आपल्या मित्रमैत्री, नातेवाईकांना कळावे म्हणून सेल्फी काढून लगेच फेसबुक आणि एमएमएस पाठविण्यातही उत्साह दिसून आला.

First published on: 16-10-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voters uploading selfies on socail networking site after voting