वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळले नाही, तसेच वेगावर नियंत्रण ठेवले नाही तर वाहनचालकांचे अपघात होऊन नुकसान होतेच; पण ज्याच्यावर जाऊन तुम्ही आदळाता त्या निष्पाप जिवांचाही त्यात बळी जातो. यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी राज्य रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत महामार्ग पोलिसांनी घेतलेल्या स्पर्धाच्या विजेत्यांचा सत्कारप्रसंगी नेरुळ येथे व्यक्त केले.  कायद्याच्या बंधनात राहून मस्ती देखील शिस्तीमध्ये व्हावी. असा उपदेशही त्यांनी दिला.  त्यामुळे महामार्ग वाहतूक पोलिसांच्यावतीने शाळा – महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी कार्यक्रम  सातत्याने राबविणे आवश्यक आहे असे पाटील आवर्जून म्हणाले. महामार्ग वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत राज्यातील शाळा महाविद्यालयामध्ये पाच गटामध्ये चित्रकला, निबंध, पोस्टर स्पर्धीचे आयोजन करण्यात आले होते.  विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांचे राज्याचे गृहमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या चित्रांचे एक कोलाज तयार करुन त्यांचे ग्रीटीग अथवा कॅलेंडर बनवून त्याचे प्रत्येक शाळेत वितरण केल्यास रस्ता सुरक्षेचा संदेश प्रभावीपणे विद्यार्थी आणि पालकांपर्यत पाहेचेल अशा सुचना वाहतुक पोलीसांना पाटील यांनी दिल्या.