डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याच्या कडक कारवाईदरम्यान शेती आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करणाऱ्या अवैध विदेशी नागरिकांसाठी तात्पुरता पास देण्याची योजना जाहीर केली आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांची काळजी असल्याचे सांगितले. शेती क्षेत्र वाचवण्यासाठी आणि हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांना अभय देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.