छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, आदर्श शासनकर्ता राजा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पश्चिम भारतात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना आदराने शिवराय, राजे, शिवाजी महाराज म्हटले जाते. त्यांनी विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, मुघल साम्राज्याशी लढा दिला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आहे. मोघलांचं साम्राज्य असताना स्वराज्याची आस भारतात रोवणारा जाणता राजा म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं. शिवाजी महाराजांचं राज्य संपवण्यासाठी औरंगजेबाला महाराष्ट्रात तळ ठोकावा लागला व तब्बल २७ वर्षांनी तो इथंच मरण पावला पण स्वराज्य संपवू शकला नाही. स्वराज्य प्रत्यक्षात आणतानाच जाती व धर्माधारित भेदांना थारा शिवाजी महाराजांनी कधीही दिला नाही व समस्त रयतेचा एकसमान विचार केला म्हणूनही त्यांना रयतेचा राजा संबोधण्यात येते.Read More
केंद्रीय पाठ्यपुस्तक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे धडे शिकवले जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी…
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने ३४५ व्या शिवपुण्यतिथीनिमित्त ‘भारतीय संस्कृतीचे जीर्णोद्धारक छत्रपती शिवराय’ या विषयावर पांडुरंग बलकवडे यांचे व्याख्यान आयोजित…
राज्याच्या अनेक भागात वैशाख शुद्ध द्वितीयेस परंपरेने शिवजयंती साजरी केली जाते. या दिवशी सातारा, सांगली आणि कोल्हापुरात शिवजयंतीनिमित्त अनेक कार्यक्रमांचे…
Devendra Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj Memorial : खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या…