scorecardresearch

नाशिक

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
Taklachi Wadi, Barichi Wadi , Water, loksatta news,
नाशिक : टाकळ्याची वाडी, बारीची वाडीचा पाणीप्रश्न लवकरच दूर, सोशल नेटवर्किंग फोरमचा पुढाकार, ठाण्यातील संस्थेची मदत

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टाकळ्याची वाडीला पाण्याच्या एकेका थेंबासाठी झगडावे लागत असल्याचे समजल्यानंतर…

nashik farmers,
नाशिक : जिल्ह्यात सहा लाखपेक्षा अधिक हेक्टरवर पीकपेरा, खतांबरोबर इतर वस्तूची सक्ती केल्यास गुन्हा, खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. हवामान विभागाने यंदाचा पावसाळा समाधानकारक राहील, असा अंदाज वर्तविला आहे.

nashik farmer lightning death
नाशिक: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, मुलगा जखमी; दोन हजार कोंबड्या मृत्युमुखी

सलग नऊ ते १० दिवस वळिवाच्या पावसाने नाशिकला झोडपले होते. दोन दिवस काहिशी उघडीप घेतल्यानंतर सोमवारी पुन्हा काही भागात तो…

dada bhuse
“नाशिकमध्ये शिवसेना गटबाजीपासून दूर”, दादा भुसे यांचा दावा

भुसे नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे गटात सारे काही आलबेल असल्याचे त्यांनी सांगितले.

nashik agriculture sector
प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहायकांचे आंदोलन, खरिपाच्या तयारीत अडचणी वाढण्याची चिन्हे

कृषिमंत्री माणिक कोकाटे ज्या दिवशी शहरात खरीपपूर्व हंगामाच्या तयारीचा आढावा घेणार होते, तोच दिवस कृषी सहायकांनी आंदोलनासाठी निवडला.

uddhav Thackeray shivsena
ठाकरे गट वाहतूक सेनेचा मोर्चा, त्रासदायक प्रमाणपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी

मोर्चाचे नेतृत्व वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र तथा नाशिक जिल्हाध्यक्ष अजिम सय्यद, संपर्कप्रमुख देवानंद बिरारी, ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर, दत्ता…

nashik congress news in marathi
काँग्रेसच्या तिरंगा फेरीत शहिदांना श्रद्धांजली

भारताचे जे जवान शहीद झाले, त्यांना नमन करून तसेच भारतीय लष्कराचे मनोबल उंचावण्यासाठी शहर काँग्रेसच्यावतीने तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले…

unseasonal rain crops damage
राज्यात २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, अमरावती जिल्ह्यास वळिवाची सर्वाधिक झळ

वळीव पावसाने राज्यात २७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून यात सर्वाधिक नुकसान अमरावती जिल्ह्यात असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिक…

wani police booked Suryoday Hospital doctors after mother baby died during childbirth
प्रसूतीवेळी मातेसह बाळाचा मृत्यू , अकरा महिन्यांनी डाॅक्टरविरुध्द गुन्हा

वणी येथील सूर्योदय हाॅस्पीटलमध्ये प्रसूतीवेळी मातेचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांच्या तक्रारीवरुन डाॅक्टरां विरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

Nashik suburb power cut news in marathi
उपनगर परिसरात रविवारी वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद; महावितरणकडून दुरुस्तीची कामे

विद्युत यंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीसाठी रविवारी सकाळी साडेआठ ते दुपारी दीड या वेळेत महावितरणकडून वीज पुरवठा टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या