scorecardresearch

नितीन गडकरी

नितीन गडकरी

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 21 May 1957
वय 67 Years
जन्म ठिकाण नागपूर
नितीन गडकरी यांचे चरित्र

नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेले नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे भाजपचे देशातील मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदींच्या २०२४ च्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नितीन गडकरींना Highway Man of India म्हणून ओळखले जाते. विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते सक्रिय झाले. १९८९ साली ते भाजपकडून विधान परिषदेचे आमदार झाले. त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे.
१९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (PWD) मंत्री म्हणून काम केले. २००४ ते २००९ दरम्यान गडकरींनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद भुषवले. त्यानंतर त्यांनी २००९ ते २०१३ पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गडकरींनी एम.कॉम, एलएलबी आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

Read More
नितीन गडकरी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
जयराम गडकरी
आई
भानुमती गडकरी
जोडीदार
कांचन गडकरी
मुले
निखिल गडकरी, सारंग गडकरी, केतकी गडकरी
नेट वर्थ
₹18,79,16,075

नितीन गडकरी न्यूज

भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 
file photo
नागपूरमध्ये भाजप संघटनेतून गडकरींच्या दोन्ही समर्थकांची गच्छंती !

महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अत्यंत महत्वाचे ठरणारे पक्षाचे शहर आणि जिल्हा अध्यक्षपद या दोन्ही पदांवरून गडकरी समर्थकांना बाजूला करून इतरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहकार कायद्यात लवकरच आमूलाग्र बदल, समित्या स्थापण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा (Photo Credit - X/CMO Maharashtra)
सहकार कायद्यात लवकरच आमूलाग्र बदल, समित्या स्थापण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप दिघे उपस्थित होते.

बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राच्या दुसर्याा आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. शेजारी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
शंकररावांच्या ‘त्या’ कृतीवर इंदिरा गांधी खवळल्या होत्या ! बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्रातील गौप्यस्फोट

या आत्मकथेत इंदिरा गांधी यांच्याशी झालेल्या एका भेटीतील चर्चेचा तपशील नोंदवताना विखे पाटील यांनी शंकररावांच्या ‘त्या’ कृतीवर इंदिराबाई काय म्हणाल्या, ते शब्दशः नोंदविले आहे.

 नागनदीवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे,आता या पात्रात उड्डाणपुलाचे स्तंभ उभारण्यात येत आहेत.(छायाचित्र: लोकसत्ता टीम)
गडकरींच्या प्रकल्पासाठी नागपूरच्या नागनदीत सिमेंटचे खांब

गडकरी यांचा कमाल चौक ते उमरेड रोड, दिघोरी पर्यंत शहरातील सर्वांत लांब उड्डाण पूल हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यातून उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि दक्षिण नागपुरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दीष्ट आहे.

आता परिस्थिती बदलली. तेच दगड मारणारे भाजपमध्ये आले नितीन गडकरी.(छायाचित्र -लोकसत्ता टीम )
पूर्वी आमच्या घरावर दगड मारणारेच आता भाजपमध्ये आले… श्रद्धांजली सभेतही नितीन गडकरींनी थेटच…

पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांच्या घरावर दगड मारणारेच आता भाजपमध्ये आले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ताशेरे एनएचआयवर, तडे गडकरींच्या प्रतिमेला ! (image source - Nitin Gadkari FB page )
ताशेरे एनएचआयवर, तडे गडकरींच्या प्रतिमेला !

कंत्राटदाराची मनमानी व त्यातून कामे पूर्ण होण्यास होणाऱ्या विलंबाची दखल घेत उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला चांगलेच खडे बोल सुनावले.

नितीन गडकरी ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
खासगीकरण सहकार चळवळ संपुष्टात – नितीन गडकरी

सहकार चळवळीचे खासगीकरण झाल्यामुळे ही चळवळ संपुष्टात आली. या प्रवृत्तीमुळे अनेक सहकारी संस्था आजारी होत पुढे बंद झाल्या, अशी खंत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केली.

गडकरींच्या खात्याने बांधलेला उड्डाणपूल दुरुस्तीला ६ महिने; या तारखेला खुला होणार (लोकसत्ता टीम)
गडकरींच्या खात्याने बांधलेला उड्डाणपूल दुरुस्तीला ६ महिने; या तारखेला खुला होणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेला बुटीबोरी उड्डाण पुलास साडेतीन वर्षांतच तड गेल्याने सहा महिन्यांपासून त्यावर वाहतूक बंद आहे.या पुलाची दुरुस्तीच्या कामाला एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी नको रे बाबा…नितीन गडकरींच्या शहरात…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरातील नागरिकांनी ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’कडे (एचएसआरपी) पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

(छायाचित्र - लोकसत्ता टीम)
गडकरींची लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी भेट, अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश…

अकोला दौऱ्यात नितीन गडकरी यांनी खासदार, आमदारांच्या निवासस्थानी भेटी देत विकास कार्याची माहिती घेतली.

गडकरींचा लाडका आमदारच उड्डाण पुलाच्या बांधकामावर संतप्त ! (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
गडकरींचा लाडका आमदारच उड्डाण पुलाच्या बांधकामावर संतप्त !

गडकरींच्या कृपेमुळेच मतदरसंघात रस्ते,उड्डाण पुलांचे जाळे विणले गेले असा दावा करणाऱ्या खोपडे यांच्यावर उड्डाण पुलाच्या बांधकामाची गडकरींकडे तक्रार करण्याची वेळ आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समाजमाध्यमात ट्रोल होत आहेत

जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या जुन्या वक्तव्यावरून मोठ्या ट्रोल होत आहेत.

संबंधित बातम्या