सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँक) ८६वा स्थापना दिन पुणे येथील मुख्य कार्यालयात बुधवारी दृक्श्राव्य माध्यमातून परिषदेद्वारे ग्राहकांच्या उपस्थितीत साजरा केला.

या समारंभात बँकेच्या क्रेडिट कार्डचे उद्घाटन करण्यात आले. बरोबरीने महाबँक सुवर्णकर्ज पॉइंट, ऑनलाइन/ टॅब बँकिंग प्रणाली आणि बँकेचे सुधारित संकेतस्थळ  http://www.bankofmaharashtra.in यांचेही अनावरण करण्यात आले. तसेच वसुली विभागाने काढलेले ‘लीगल एज’ त्रमासिक आणि मानव संसाधन व्यवस्थापन विभागाने काढलेल्या ‘कल्याणकारी योजना, निवृत्तिपश्चात लाभ व बदलीची मार्गदर्शक तत्त्वे’ या पुस्तिकांचेही प्रकाशन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव आणि कार्यकारी संचालक हेमंत टम्टा व नागेश्वर राव वाय. यांच्या उपस्थितीत  करण्यात आले. बँकेचे देशभरातील ग्राहक, प्रसिद्ध उद्योगपती, विविध क्षेत्रांतील मान्यवर हे या समारंभात व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.