२०१४च्या अखेरच्या महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादन दर मासिक तुलनेत निम्म्यावर आले आहे. खनिकर्म क्षेत्रातील संथ वाढीने डिसेंबर २०१४ मधील औद्योगिक उत्पादन दर १.७ टक्के राहिला आहे.
वर्षभरापूर्वीच्या, डिसेंबर २०१३ मधील ०.१ टक्क्य़ापेक्षा यंदाचे औद्योगिक उत्पादन उंचावले असले, तरी आधीच्या महिन्यापेक्षा, नोव्हेंबर २०१४ मधील ३.९ टक्क्य़ांच्या तुलनेत ते यंदा निम्म्यावर आले आहे. चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते डिसेंबर २०१४ या पहिल्या नऊ महिन्यांत उत्पादन दर २.१ टक्के राहिला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो अवघा ०.१ टक्के होता.
निर्मिती क्षेत्राची वाढ दोन महिन्यांपूर्वी २.१ टक्के राहिली आहे. औद्योगिक उत्पादन क्षेत्रात ७५ टक्के वाटा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वी १.१ टक्के होती. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत निर्मिती क्षेत्राची वाढ १.२ टक्के राहिली आहे. या कालावधीत खनिकर्म क्षेत्र १.७ टक्क्य़ांनी वाढले आहे; तर डिसेंबर २०१४ मध्ये ते ३.२ टक्क्य़ांनी घसरले आहे.
डिसेंबर २०१४ मध्ये औद्योगिक उत्पादन क्षेत्रात गणल्या जाणाऱ्या २२ उद्योगांपैकी १३ क्षेत्रे वाढीच्या यादीत राहिली आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2015 रोजी प्रकाशित
खाणकाम मरगळीची औद्योगिक उत्पादन दराला खणती!
२०१४च्या अखेरच्या महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादन दर मासिक तुलनेत निम्म्यावर आले आहे. खनिकर्म क्षेत्रातील संथ वाढीने डिसेंबर २०१४ मधील औद्योगिक उत्पादन दर १.७ टक्के राहिला आहे.वर्षभरापूर्वीच्या, डिसेंबर २०१३ मधील ०.१ टक्क्य़ापेक्षा यंदाचे औद्योगिक उत्पादन उंचावले असले, तरी आधीच्या महिन्यापेक्षा, नोव्हेंबर …

First published on: 13-02-2015 at 05:56 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hc orders two mines off the block more could follow