मूळची फिनिश कंपनी नोकियाच्या जगातील सर्वात मोठा निर्मिती प्रकल्प शनिवारपासून अखेर बंद होत आहे. नोकियाचा चेन्नई येथील प्रकल्पातील मोबाइल हॅण्डसेट निर्मिती यापूर्वी ठप्प पडली आहे.
नोकियाने आपला संपूर्ण व्यवसाय मायक्रोसॉफ्टला ७.२ अब्ज डॉलरना विकण्याचा सप्टेंबर २०१३ मध्ये घेतलेल्या निर्णयाची पूर्तता कंपनीने मार्च २०१४ अखेर केली. मात्र २,४०० कोटी रुपयांच्या करतिढय़ावरून तमिळनाडू राज्यातील या प्रकल्पाचा विलीनीकरणाचा समावेश करण्यात आला नव्हता. प्रकल्प मायक्रोसॉफ्टला हस्तांतर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नोकियाकडे ३,५०० कोटी रुपयांची हमी मागितली होती. अखेर हा प्रकल्पच बंद करण्याचे पाऊल नोकियामार्फत उचलण्यात आले. येथील साहित्य सामग्री व्हिएतनाममध्ये हलविण्यात आली आहे. तर ८,४०० पैकी ५,७०० कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2014 रोजी प्रकाशित
नोकियाचा चेन्नई प्रकल्प आजपासून बंद
मूळची फिनिश कंपनी नोकियाच्या जगातील सर्वात मोठा निर्मिती प्रकल्प शनिवारपासून अखेर बंद होत आहे.

First published on: 01-11-2014 at 01:21 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia suspend chennai unit operations