आयुर्विमा पॉलिसीचा दस्तऐवज कसा वाचवा आणि त्यातील कोणते महत्त्वाचे मुद्दे कसे पाहावेत?

वित्त मानस

जीवन विमा योजना दोन प्रकारे ओळखल्या जातात – पारंपरिक आणि युनिट लिंक्ड. शुल्क हे युनिट लिंक्ड विमा योजनेशी निगडित असतात आणि या योजनेखालील लाभातून कारभार खर्च वजा करण्यात येतो.

युनिट लिंक्ड अर्थात युलिप प्रकारच्या योजनांमध्ये ग्राहकाने भरलेला हप्ता विविध फंडांमध्ये गुंतवण्यात येतो. हप्ता वाटप शुल्क कापल्यानंतर उर्वरित रक्कम प्रामुख्याने १०० टक्के इक्विटी ते १०० टक्के रोख्यांमध्ये गुंतवलेली असते. खालील प्रकारचे शुल्क पॉलिसीतून देऊ  केलेल्या लाभांतून कारभार आणि सेवांकरिता कापले जातात.

कारभार शुल्क- पॉलिसीचा कारभार पाहिल्याबद्दल दर महिन्याला कापले जाणारे शुल्क

मॉरटॅलिटी चार्जेस किंवा विमा कवच खर्च- विम्याचे कवच पुरविल्याने दर महिन्याला हे शुल्क कापण्यात येतात.

निधी व्यवस्थापन शुल्क- विमादाराने भरलेल्या हप्त्याची रक्कम गुंतवण्यासाठी निधीचे व्यवस्थापन करण्यासाठी लागणारे शुल्क. हे शुल्क रकमेच्या टक्केवारीवर ठरते व निधीच्या निव्वळ मालमत्ता किंमत (एनएव्ही)तून ते वजा करण्यात येते.

ही सर्व शुल्क कंपनीच्या निर्णयावर आणि विविध उत्पादनांच्या रचनांवर अवलंबून आहेत. बहुसंख्य युनिट लिंक योजना याप्रकारचे  शुल्क आकारतात. परंतु काही कंपन्यांच्या काही योजना अशा आहेत, ज्यामधील हप्ता वाटप आणि पॉलिसी कारभाराच्या शुल्कांविषयी वाटाघाटी करणे किंवा ते शून्य करून उत्पादन ग्राहकाभिमुख करण्यात येते.

पॉलिसी दस्तऐवजात नमूद करण्यात आलेले सर्व प्रकारचे शुल्क लाभासहित ग्राहकांना देऊ  करण्यात येतात.

पॉलिसी दस्तऐवज हा अनेक भागांमध्ये विभागलेला असतो. त्यात सुरुवातीला स्वागत पत्र असते, ग्राहकाची माहिती, उत्पादनांची माहिती, नामांकनासंबंधी माहिती (नॉमिनेशन), देऊ  केलेले लाभ, युनिट लिंक्ड उत्पादनांचे दर, दावा आणि तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तुम्हाला अनुक्रमे दावा आणि तक्रार दाखल करण्यास मदतीच्या ठरतात.

सर्व विभागांना समान महत्त्व आहे. मात्र ग्राहकाने अगोदर स्वत:ची माहिती आणि नामांकन योग्यरीतीने भरले पाहिजे. त्यानंतर त्याला/तिला योजनेंतर्गत मिळणाऱ्या लाभांची माहिती पाहिजे. जेणेकरून केलेल्या खरेदीचे समाधान त्याला मिळेल.

दावा प्रक्रिया : हे समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे. आपले कुटुंबीय पॉलिसीबाबत सजग आहेत, याची खातरजमा ग्राहकाने करावी. पॉलिसीच्या दस्तऐवजांची माहिती त्याने करून घ्यावी. जेणेकरून गरजेच्या वेळी कुटुंबीयांची गैरसोय होणार नाही.

पॉलिसीचे दस्तऐवज हे विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यातील कराराचा कायदेशीर पुरावा आहे, त्यामुळे त्याचे वाचन काळजीपूर्वक केले पाहिजे.

’ दीपक मित्तल

(लेखक एडेल्वाइज टोकियो लाइफ इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी आहेत.)