गुंतवणूक-भांडाराच्या मजबुतीसाठी

प्रचलित व्यापारचक्रावर अवलंबून समभाग आणि उद्योगक्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

‘बिझनेस सायकल’च्या निर्देशांचा वापर उपयुक्त

मुंबई : व्यापारचक्राच्या एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जाताना विविध क्षेत्रांमध्ये बदल होत असतात आणि ते ठरावीक काळातील समभाग गुंतवणुकीतील कामगिरीचा कल ठरविणारे महत्त्वाचे घटक ठरतात. याचाच अर्थ विपरीत बाजार स्थितीमुळे गुंतवणुकीला धोके हे व्यापारचक्रातील बदलानुसार घडत असतात. म्हणजेच ‘व्यापारचक्र’ ही संकल्पना समजून घेतली तर संधीची क्षेत्रे ओळखून आक्रमकपणे गुंतवणूक करून मोठा फायदाही मिळविता येऊ शकतो.

व्यापारचक्र (बिझनेस सायकल) म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या उत्पादन, व्यापार आणि सामान्य आर्थिक घडामोडी या घटकांमधील चढ-उतार म्हणता येईल, असे ऑप्युलन्स मनी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक संजय कोतकर यांनी सांगितले. विस्तार, अत्युच्च स्थान, घसरणीला सुरुवात आणि मंदी असे प्रत्येक व्यापारचक्राचे चार टप्पे असतात. घसरण, नफा, उपलब्ध पत, विक्री न झालेल्या उत्पादनाचा साठा, रोजगार, चलनविषयक धोरण आणि इतर आर्थिक घडामोडींमध्ये होणाऱ्या बदलांवर व्यापारचक्राच्या टप्प्यांमध्ये होणारे बदल अवलंबून असतात. व्यापारचक्राच्या टप्प्यांचा अपेक्षित क्रम ठरलेला असतो आणि तो साधारणत: विस्तार ते घसरणीला सुरुवात या दरम्यान बदलत राहतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

अर्थात ही संकल्पना समजण्यासाठी अगदी सोपी वाटली तरी सामान्य व्यक्तीला त्या आधारे गुंतवणुकीचा निर्णय घेणे अथवा गुंतवणूक-भांडारात (पोर्टफोलिओ) आवश्यक ते फेरबदल करणे आव्हानात्मक असल्याचे कोतकर यांनी नमूद केले. यावर आधारित गुंतवणुकीसाठी व्यापारचक्रांचा सखोल अभ्यास आणि उत्तम समज तसेच गुंतवणुकीचा अनुभव असणे गरजेचे असते.

विविध म्युच्युअल फंड घराण्यांद्वारे व्यापारचक्रावर बेतलेल्या चार योजना सध्या उपलब्ध असून, आदित्य बिर्ला सन लाइफ बिझनेस सायकल फंड ही पाचवी योजनेची प्राथमिक विक्री २९ नोव्हेंबपर्यंत गुंतवणुकीसाठी खुली आहे. प्रचलित व्यापारचक्रावर अवलंबून समभाग आणि उद्योगक्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Depth study and understanding of business cycles must for investing says sanjay kotkar zws

Next Story
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित
ताज्या बातम्या