scorecardresearch

फंड निवडीसाठी परतावा पाहणे पुरेसे?

गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याबद्दल विचार करा की एकाच फंडाचा मागील दोन वर्षांच्या कालखंडात अति आकर्षक ते निरस परतावा का असतो.

फंड निवडीसाठी परतावा पाहणे पुरेसे?
(संग्रहित छायाचित्र)

भावना आचार्य

आज तुम्ही गुंतवणूक केलेला कोणताही इक्विटी फंड निवडा आणि त्याचा मागील वर्षभरातील परतावा अगदी निरस असेल, असे दिसेल. मागील वर्षभरात फंडांनी १० ते उणे ६ टक्के परतावा दिलेला आहे. दोन वर्षांपूर्वी आकर्षक दिसणारा आणि त्यापूर्वी एक वर्ष दिसणारा दोन आकडय़ातील परतावा गेला कुठे असा प्रश्न पडला असेल.

गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याबद्दल विचार करा की एकाच फंडाचा मागील दोन वर्षांच्या कालखंडात अति आकर्षक ते निरस परतावा का असतो. आणि या वेगवेगळ्या परताव्यावर गुंतवणुकीबद्दल प्रतिक्रिया काय असेल? कदाचित तुमची फसवणूक झाली असे वाटणेसुद्धा शक्य आहे.

केवळ पॉइंट-टू-पॉइंट

आज बीएनपी परिबाज लार्ज कॅपची एक वर्षांची कामगिरी २० टक्कय़ांच्या आसपास दिसत आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्यूचिप ९ टक्कय़ांच्या परताव्यासह आज बीएनपी परीबाज लार्जकॅप फंड आयसीआयसीआय ब्ल्यूचिपच्या तुलनेत चांगला दिसत असला तरी एक वर्षांपूर्वीचे एका वर्षांचे परतावे बीएनपी लार्ज कॅपच्या ५.८ टक्कय़ाच्या तुलनेत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ब्ल्यूचिप ७.१ टक्के होता. दोनही फंडाचा ५ वर्षांचा परतावा १०.५ टक्कय़ांच्या आसपास आहे.

आता कोणता फंड गुंतवणुकीसाठी अधिक चांगला? उत्तर असे आहे की, आपण निवड करण्यासाठी १,३, आणि ५ वर्षांचा परतावा किंवा एक किंवा काही दिवसांचा परताव्यावर जाऊ  नये. तसेच या परताव्यानुसार नवीन गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याबद्दलच्या पूर्वानुमान काढू नये. या प्रकारच्या परताव्याला ‘पॉइंट-टू-पॉईंट रिटर्न’ म्हणतात. म्हणजे एका निश्चित कालखंडात दोन आधारबिंदुंच्या आधारे मिळालेला परतावा. पॉइंट-टू-पॉईंट परताव्याद्वारे फंड निवडणे पुढील कारणांनी दिशाभूल करणारे ठरू शकते.

१. हे दरम्यानच्या कालावधीकडे दुर्लक्ष करते

म्हणजेच पॉइंट-टू-पॉइंट परतावा फक्त वर्षांतील एका दिवसातुन दुसऱ्या दिवसात एनएव्हीमध्ये बदल दर्शवते. म्हणूनच या दोन तारखांमधील महिने किंवा वर्षांत काय घडले त्याविषयी परतावा आपल्याला काही सांगत नाही. वषानुवर्षे इक्विटी आणि रोखे बाजार टप्प्या टप्प्याने वर किंवा खाली जातात. पॉईंट-टू-पॉईंट परतावा दर्शवित नाहीत की ही परतावा कसा बदलला आहे किंवा दोन आधारबिंदुंमध्ये किती अस्थिरता होती.

इक्विटी फंडासाठी सध्याचे ५ वर्षांंचा परतावा – उदाहरणार्थ २०१५मध्ये लार्ज-कॅप निर्देशांकात घट झाली. २०१८ मध्ये फारशी चांगली कामगिरी नव्हती. २०१६ आणि २०१७ मध्ये असे काही काही महिने होते सर्वच फंडांना नुकसान झाले. एका वर्षांच्या आधारावर झालेले नुकसान आणि त्यापूर्वीही एका वर्षांच्या आधारे झालेला फायदा माहित असल्यास सध्या एका वर्षांच्या कालावधीत नुकसान दाखविणारा फंड पाच वर्षांच्या कालावधीच्या कामगिरीच्या आधारे गुंतवणुकीसाठी निवडाल.

२. दोन आधारबिंदु दरम्यान घडलेल्या घटनांचा पराताव्यावर प्रभाव असतो

समजा आपण यावर्षी १२ नोव्हेंबरला ३ वर्षांच्या परतावा पाहात असाल तर या वर्षी जसे घडले तसे १ नोव्हेंबरपासून बाजार तेजीत आहे असता तर अमूक तारखेपासून तमूक तारखेपर्यंत परतावा आकर्षक दिसतो. कारण मागील नोव्हेंबरच्या तुलनेत आजच्या एनएव्ही कमालीच्या उच्च पातळीवर आहेत.

समभागांच्या किंमतींतील अलिकडील घसरणीमुळे अनेक स्मॉल-कॅप फंडांच्या सध्याच्या ३ वर्षांचे परतावा मुळीच आकर्षक नाही. जेव्हा तारखेपासून तारखेस किंवा तारखेला बाजार खाली जातो तेव्हा ‘लो बेस’ आजच्या परताव्याची आकडेमोड होते.

डायनॅमिक बाँड आणि गिल्ट फंडांमध्ये कमी/२०१८ च्या मध्यावर व्याजदर वाढीमुळे रोख्यांच्या किंमती घसरत होत्या. एक वेळ अशी होती जेव्हा व्याज दर कमी होण्याची आशा होती आणि रोख्यांच्या किंमती वाढत्या होत्या. परिणामी, कित्येक डायनॅमिक बाँड आणि बहुतेक गिल्ट फंड एक वर्ष कालावधीत तोटा दाखवत होते. सध्या २०१९ गिल्टच्या किंमती वाढत आहेत. या गिल्ट फंडांचा तीन वर्षांचा परतावा ७ ते ९ टक्कय़ादरम्यान आहे.

२०१७ मध्ये घसरण आणि २०१८च्या अखेरीपासून रोख्यांच्या किंमती गाठत असलेल्या शिखरामुळे एक वर्षांचा परतावा आकर्षक तीन वर्षांचा परतावा गुंतवणूक करावी असा न वाटणारा आहे.

ही आकडेवारी फंडाची रणनीती दर्शवित नाही. आधी सांगितल्याप्रमाणे, फंड कार्यक्षम आहे अथवा नाही हे जाणून घेण्याचे हे एक साधन आहे. फंडाची रणनीतीदेखील जोखमीच्या अपेक्षा निश्चित करते. वृद्धीक्षम रणनीती अनुसरण करणारा फंड आज मूल्य-धरी तरणनीती आजमावणाऱ्या फंडापेक्षा चांगला परतावा दाखवेल.

कमी मिड-कॅप मात्रा असलेला फंड अधिक मिड-कॅप मात्रा असलेल्या  फंडापेक्षा चांगला परतावा देईल अथवा नाही हे तत्कालील परिस्थितीवर अवलंबून असेल. मुदतीची जोखीम आणि मुद्दलाची जोखीम दोन्ही परताव्यामागे दडलेल्या असतात.

आधी सांगितल्याप्रमाणे, डायनॅमिक बाँड आणि गिल्ट फंड एका वर्षांचा उच्च परतावा दर्शवितात. परंतु हे अस्थिरता आणि उच्च जोखीमसह येते. कमी  व्याजदर कमतीच्या काळात दीर्घमुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक करणारे फंड अव्वल परतावा देतात; परंतु त्यापेक्षा कमी कालावधीसाठी योग्य नसतात.   अनुकूल असतात.

(लेखिका ‘प्राइमइन्व्हेस्टर’च्या सह-संस्थापिका आहेत.)

थोडक्यात काय तर..

परतावांवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत आणि आपल्याला या घटकांच्या प्रभावांचा विचार करणे आवश्यक आहे.

आपल्याला हे उत्पन्न केवळ एका दिवसातच नव्हे तर काही कालावधीत पहाण्याची आवश्यकता आहे, जे आपल्याला कामगिरीमध्ये सातत्य दर्शवेल.

परतावा दररोज, आठवडा, महिना आणि वर्षांत बदलत असतो. १, ३ ५ वर्षांच्या पराताव्यावर फंड निवड केल्यास पदरी निराशा पडेल.

आपण किती काळ गुंतवणूक केली पाहिजे हे ठरविण्याआधी १,३,५ वर्षांच्या परताव्याची एकमेकांशी तुलना करू नका.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2019 at 01:47 IST