सामान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘फिनटेक क्रांती’ची गरज – पंतप्रधान

आगामी दशकभरापेक्षा कमी कालावधीत डिजिटल बँकांनाच सामान्य रूप आलेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवी दिल्लीदेशातील प्रत्येक नागरिकाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित वित्तीय उपक्रमांनी आता ‘फिनटेक क्रांती’चे रूप घेण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे अधोरेखित केली. या तंत्रज्ञानाधारित वित्तीय सेवांच्या (फिनटेक) उपक्रमांनी नवोन्मेषी प्रयोग म्हणून सुरुवात करीत मोठे सुयश मिळविले आणि लोकांमधून स्वीकारार्हता मिळविली, असे गौरवोद्गार त्यांनी इन्फिनिटी फोरम या परिसंवादाच्या उद्घाटकीय भाषणात काढले.

तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडून येत आहे, यावर भर देऊन पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या वर्षी एटीएममधून जितकी रोख काढली गेली, त्यापेक्षा किती तरी अधिक रकमेचे व्यवहार हे मोबाईल फोनवरील डिजिटल देयक व्यासपीठावरून झाले आहेत. कोणत्याही भौतिक शाखांविना पूर्णपणे डिजिटल बँका अस्तित्वात येऊन, आजवर कल्पनेत असलेली वास्तवात आली आहे. आगामी दशकभरापेक्षा कमी कालावधीत डिजिटल बँकांनाच सामान्य रूप आलेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘डिजिटल इंडिया’अंतर्गत हाती घेतल्या गेलेल्या परिवर्तनकारी उपक्रमांमुळे नावीन्यपूर्ण ‘फिनटेक’ उपाययोजनांसाठी शासनाचे दरवाजे उघडले गेल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fintech revolution needed for financial empowerment pm narendra modi zws