सेन्सेक्स पंधरवडय़ाच्या उच्चांकावर

सप्ताहारंभात सुरुवातीची घसरण मागे टाकत सेन्सेक्स सोमवारअखेर ११६.३२ अंशांनी उंचावला. २७,२०६.७४ वर स्थिरावताना सेन्सेक्स गेल्या दोन आठवडय़ाच्या उंच्चांकावर पोहोचला.

सप्ताहारंभात सुरुवातीची घसरण मागे टाकत सेन्सेक्स सोमवारअखेर ११६.३२ अंशांनी उंचावला. २७,२०६.७४ वर स्थिरावताना सेन्सेक्स गेल्या दोन आठवडय़ाच्या उंच्चांकावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा प्रमुख निर्देशांकही आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी २४.८५ अंशांची कमाई करत, ८,१०० च्या पुढे राहत, ८,१४६.३० पर्यंत गेला.
आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारातील नकारात्मक उलाढालीकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांची समभाग खरेदीचे धोरण अनुसरले. यामध्ये आयटीसी, ओएनजीसी, टाटा मोटर्स, एचडीएफसी, स्टेट बँक यांच्या समभागांना मागणी राहिली.
रुपयातील तेजी नरमली
सप्ताहारंभी भारतीय चलन अवघ्या एक पैशांनी रोडावले. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी ६०.८२ पर्यंत घसरला. यामुळे गेल्या सलग चार व्यवहारातील चलनातील तेजी रोखली गेली. रुपयाचा आठवडय़ातील पहिल्या दिवसाचा प्रवास ६०.८५ वर सुरू झाला. व्यवहारात तो ६०.७४ पर्यंत उंचावल्यानंतर ६०.८८ या दिवसाच्या नीचांकासह नकारात्मक स्थितीत बंद झाला. गेल्या आठवडय़ात सोमवार वगळता चलनाने एकूण ३२ पैशांची वाढ नोंदविली होती.
चांदीतील उतराई कायम
मुंबईच्या सराफा बाजारातील पांढऱ्या धातूची नरमाई सोमवारीही कायम राहिली. किलोच्या चांदीचा दर ८३० रुपयांनी कमी होत ४० हजाराच्याही आत विसावला. चांदीला किलोसाठी ३९ हजार ६८० रुपयांचा भाव मिळाला. शनिवारीही चांदीचे दर ८१० रुपयांनी खाली आले होते. तर सोने दरात १०० रुपयांची घसरण झाल्याने स्टॅण्डर्ड प्रकारच्या धातूचा तोळ्याचा दर २६,४०० रुपयांवर स्थिरावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensex reverses losses to end with 116 point gain