अलीकडे ई-कॉमर्स कंपन्यांकडे बहुतांश खरेदी मोबाइलवरून आणि त्याच माध्यमातून आर्थिक उलाढालींचे वाढलेले प्रमाण पाहता, मोबाइलच्या कार्यप्रणालीतील सुरक्षिततेला ग्राहकांमध्ये महत्त्व वाढत असल्याचे आढळून येत आहे. झायकॉम इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी लि.ने राबविलेल्या एका आगळ्या उपक्रमातून इलेक्ट्रॉनिक सुरक्षेच्या निकडीला ट्विटरवरून भारतातील ४५.१ दशलक्ष ग्राहकांनी कौल दिला आहे. या उपक्रमामध्ये झायमन या मोबाइल सेफ्टी अॅपद्वारे विविध वयोगटांतील लोकांना त्यांना सेवेद्वारे अपेक्षित असलेल्या सुरक्षाविषयक गरजा विचारण्यात आल्या. बाजारामध्ये जरी इतर मोबाइल सुरक्षा उपाययोजना उपलब्ध असल्या तरी झायमनच्या गुणविशेषांमुळे त्याने ग्राहकांची योग्य नस पकडली असल्याचेही या उपक्रमातून अधोरेखित झाले, असे झायकॉमचे इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी विभागाचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद राव यांनी सांगितले. हे झायमन मोबाइल अॅप अतिशय ग्राहक-स्नेही, आणीबाणीप्रसंगी तत्पर प्रतिसाद आणि मदतीची चोख हमी ते देते, असा त्यांनी दावा केला.