21st December Rashi Bhavishya In Marathi : २१ डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी आहे. षष्ठी तिथी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहील. प्रीति योग संध्याकाळी ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत राहील. तसेच संपूर्ण दिवस आणि रात्र पार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत पूर्वा फाल्गुनी नक्षत्र जागृत राहील. शनिवारी राहू काळ सकाळी ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल. तसेच आजपासून उत्तरायणारंभ सुरु होणार आहे. म्हणजेच शिशिर ऋतूचा प्रारंभ होत आहे. तर आजचा दिवस १२ राशींसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊया…

२१ डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- जोडीदाराच्या दिलदार वृत्तीची प्रशंसा करा. कोणाकडून फसले जाणार नाही याची दक्षता घ्या. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यापारी वर्गाने चिकाटी सोडू नये. नवीन गोष्टी आमलात आणाव्यात.

वृषभ:- उगाचच भांडणात पडू नका. घरात खबरदारी घेऊन काम करावे. मन शांत ठेवून कार्यरत राहावे. कार्यालयीन सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता. धैर्याने परिस्थिती हाताळावी.

मिथुन:- मनातील चुकीच्या विचारांना हद्दपार करा. आपली उपासना सफल होईल. आजचा दिवस चांगला जाईल. घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरदार वर्गाला चांगली बातमी मिळेल.

कर्क:- स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वडीलधार्‍या मंडळींची काळजी घ्यावी. दिनक्रम व्यस्त राहील. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. समोरच्या व्यक्तिमधील चुका काढत बसू नका.

सिंह:- घरात शांततेचे वातावरण राहील. नवीन नोकरीच्या संधी दिसून येतील. आवडत्या वस्तु खरेदी कराल. संवाद कौशल्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडाल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.

कन्या:- कष्टाच्या मानाने यश पदरी पडेल. स्पर्धेत यश मिळवाल. कामानिमित्त प्रवास घडेल. सर्वत्र आनंद शोधाल. अचानक खर्च उद्भवू शकतात.

तूळ:- अनावश्यक खर्च कमी करा. नवीन गोष्टीत सावधानतेने पाऊल टाका. मित्रांचे सहकार्य लाभू शकेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. अधिकारात वृद्धी होईल.

वृश्चिक:- केलेला संकल्प पूर्ण होईल. आपले विचार लोकांसमोर मांडाल. पोटाचे विकार त्रस्त करू शकतील. एखाद्या प्रसंगामुळे चिडचिड संभवते. अनावश्यक खर्च उद्भवतील.

धनू:- आपला आत्मविश्वास कायम ठेवा. घरासंबंधीची कामे पूर्ण करा. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भौतिक गोष्टींचा अनुभव घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मकर:- आपला संयम कमी येईल. अति साहस दाखवू नका. आपल्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. व्यावसायिक निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. मनातील इच्छा पूर्ण होईल.

कुंभ:- कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. छोटे प्रवास संभवतात. बोलण्यातून लोकांशी जवळीक साधाल. व्यवसाईकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. मनातील नवीन योजनांचा पाठपुरावा करावा.

मीन:- नवीन संधी चालून येऊ शकते. लहान प्रवास कराल. मन काहीसे विचलीत राहण्याची शक्यता. पदोन्नतीचे योग संभवतात. घरात अतिथी जमतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर