25th July Panchang & Rashi Bhavishya : आज २५ जुलै २०२४ (गुरूवार) रोजी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची पंचमी तिथी आहे. आजच्या दिवशी पूर्वाभाद्रपदा नक्षत्र दुपारी ४ वाजून १५ मिनिट पर्यंत असेल त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र सुरू होईल. आजचा राहुकाळ दुपारी २ वाजून २३ मिनिटांपासून सुरु होईल ते दुपारी ४ वाजेपर्यंत असेल. पंचांगानुसार आजच्या दिवशी शोभन योग आणि अतिगण्ड योग असणार आहे. तर जुलै महिन्याचा शेवटचा गुरूवार मेष ते मीन राशीच्या व्यक्तींना कसा जाईल हे जाणून घेऊ या…

२५ जुलै पंचांग व राशिभविष्य :

मेष:- शांतता अधिक प्रिय असेल. सारासार विचार करूनच कृती करा. संयम सोडून चालणार नाही. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. आपल्या आवडत्या देवतेची उपासना करावी.

वृषभ:- मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. संमिश्र घटनांचा दिवस. हातातील कला सादर करता येईल. कौशल्याच्या जोरावर कामे कराल. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.

मिथुन:- कामाला चांगला वेग येईल. काही क्षुल्लक समस्येतून मार्ग निघेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. मन प्रसन्न राहील. मित्रांशी वाद घालू नयेत.

कर्क:- चिडचिड न करता कामाला गती द्या. छानछोकीसाठी खर्च कराल. व्यापारातून चांगला लाभ होईल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. अनावश्यक खर्चाला आळा घालावा लागेल.

सिंह:- आत्मविश्वास कायम ठेवावा. अचानक धनलाभ संभवतो. मनाच्या चंचलतेला आवर घाला. वरिष्ठांचे धोरण लक्षात घ्या. वैवाहिक जीवन सुखकर राहील.

कन्या:- आपले बोलणे मधाळ ठेवावे. योग्य तर्क लावाल. समोरच्याचा रोख ओळखून वागावे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल.

तूळ:- स्वत:मध्येच रमण्यात वेळ जाईल. कोणत्याही विषयाचा पूर्ण अभ्यास करूनच उत्तर द्या. तिखट पदार्थ खाणे टाळावे. मौल्यवान वस्तु सांभाळाव्यात. कामातून समाधान मिळेल.

वृश्चिक:- पोटाचे आरोग्य सांभाळावे. लोक तुमचा सल्ला ऐकतील. गरजूंना मदत कराल. परोपकाराची संधी मिळेल. संशयी वृत्तीला आळा घाला.

धनू:- घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल. घरातील लोकांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. संयमाने परिस्थिती हाताळावी.

मकर:- स्वत:च्याच आनंदात रममाण व्हाल. जवळचा प्रवास कराल. मित्रांची गाठ पडेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. भागीदारीत खुश असाल.

कुंभ:- जुन्या विचारात गुंतून राहू नका. आवडी बाबत दक्ष राहाल. करमणुकीत वेळ घालवाल. कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. मानसिक शांतता जपावी.

मीन:- आपला संयम सुटू देऊ नका. घराबाहेर प्रतिष्ठा लाभेल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. नवीन सुरुवात दिलासादायक असेल. जुने मित्र भेटतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर