Horoscope Today : ४ फेब्रुवारी २०२५ रोजी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी मंगळवारी रात्री २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत राहील. आज दुपारी १२ वाजून ०६ मिनिटांपर्यंत पर्यंत शुभ योग जुळून येईल. तसेच मंगळवारी रात्री ९.५० वाजेपर्यंत अश्विनी नक्षत्र जुळून येईल. राहू काळ दुपारी ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. त्यातील एक म्हणजे रथसप्तमी आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते. यादिवशी सूर्यदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. तर आज सूर्य देवतेच्या कृपेने कोणाच्या घरात सुख-समृद्धी येणार हे आपण जाणून घेऊया…

४ फेब्रुवारी पंचांग व राशिभविष्य (Ratha Saptami Special Mesh To Meen Horoscope) :

मेष:- शेअर्सच्या व्यवहारातून लाभ संभवतो. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वत:च्या इच्छा स्वत:च पूर्ण कराल. नवीन मित्र जोडाल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल.

वृषभ:- उत्तम व्यावसायिक लाभ होईल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. कामात वडीलांची मदत होईल. आर्थिक कामात अधिक वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

मिथुन:- वडीलधार्‍यांचा योग्य मान राखाल. दूरच्या प्रवासाचा योग येईल. हातातील कामात यश येईल. तुमच्यातील सज्जनपणा दिसून येईल. जवळचे नातेवाईक भेटतील.

कर्क:- आरोग्याची काळजी घ्यावी. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. मुलांच्या आनंदात रमून जाल.

सिंह:- घरातील कामात व्यग्र राहाल. मुलांचा धीटपणा वाढेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. वारसा हक्काच्या कामातून लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण समाधानाचे असेल.

कन्या:- जवळचा प्रवास हसत-खेळत होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. कौटुंबिक समस्या हिंमतीने सोडवाल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

तुळ:- आवडते पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. प्रवासात काही अडचणी जाणवतील. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. उगाच चिडचिड करू नका.

वृश्चिक:- आवडीच्या कामांमध्ये व्यग्र राहाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. खर्चाला वाटा फुटतील. बोलताना भान राखावे. वस्तूंची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा.

धनू:- कामातील उत्साह वाढेल. उतावीळपणे निर्णय घेऊ नका. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. नवीन संधींसाठी काही वेळ द्यावा लागेल. मध्यस्थी कामात फायदा संभवतो.

मकर:- गोष्टींची अनुकूलता समजून घ्यावी. निराशेला बळी पडू नका. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात स्त्री वर्गाचा हातभार लाभेल. धार्मिक कामांत अधिकार वाणीने वावराल.

कुंभ:- श्रम अधिक वाढू शकतात. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. अति विचार करणे टाळावे. व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता लाभेल. सर्वांशी गोड बोलाल.

मीन:- इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवाल. कामातील बदलांची कुणकुण लागेल. आवडते छंद जोपासावेत. मदतीचा हात पुढे कराल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर