Saturn Planet Margi 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी देवाला विशेष महत्त्व आहे. कर्म व न्याय देवता म्हणून शनीला ओळखला जातो. प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्याच्या/तिच्या कर्मानुरूप फळ देणारा शनी हा कलियुगातील दंडाधिकारी आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, शनी सध्या मीन राशीत विराजमान आहेत. अनेकदा लोक शनीच्या वक्री चालीनं भयभीत होतात; पण आता तब्बल ३० वर्षांनंतर ऑक्टोबरमध्ये शनी मीन राशीत मार्गी चाल म्हणजेच सरळ चाल सुरू करणार आहेत. ही चाल फक्त राशींच्या गोचरावर परिणाम करणार नाही, तर काही निवडक राशींच्या लोकांसाठी ती एक सुवर्णसंधी ठरणार आहे. शनीच्या या मार्गी हालचालीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होणार असला तरी तीन राशींच्या लोकांसाठी ही चाल जबरदस्त धनलाभ, करियरमध्ये प्रगती व भाग्योदय घेऊन येणार आहे. चला तर पाहू, कोणत्या आहेत त्या राशी…

३० वर्षांनंतर शनी सरळ मार्गावर! धन, यश आणि संधी यांचा पाऊस!

मिथुन (Gemini)

शनी आता मिथुन राशीच्या कर्मभावात मार्गी होत आहे. त्याचा थेट परिणाम करिअर आणि व्यवसायावर होणार आहे. ज्यांनी नवीन नोकरी किंवा प्रमोशनसाठी वाट पाहिली आहे, त्यांना उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांना स्टॉक मार्केट, सट्टा किंवा मोठ्या व्यवहारांमध्ये गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो. वडिलांशी संबंध सुधारतील आणि कार्यपद्धतीत सकारात्मक बदल दिसून येतील. सर्व प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात.

वृषभ (Taurus)

शनी आता वृषभ राशीच्या ११ व्या भावात मार्गी होत आहे. हा भाव उत्पन्न व लाभाचा आहे. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते. नवीन उत्पन्नाचे स्रोत सापडू शकतात. एखादी मोठी डील फायनल होण्याचे योग आहेत. तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक स्थिर व्हाल. इच्छित गोष्टी पूर्ण होण्याचा काळ सुरू होणार आहे. प्रत्येक कामाला नशिबाची साथ लाभू शकते. तुमची रास आर्थिक बाजूने मजबूत होऊ शकते. नोकरदार लोकांना बढती आणि वेतनवाढ मिळू शकते.

कुंभ (Aquarius)

शनी हे कुंभ राशीचा स्वामी असून, आता तो दुसऱ्या भावात मार्गी चालणार आहे. त्यामुळे अडकलेला पैसा मिळण्याचे योग प्रबळ आहेत. ज्यांचे करिअर वाणी, संवादकौशल्य किंवा मार्केटिंगशी संबंधित आहे, त्यांच्यासाठी हा काळ अतिशय फलदायी ठरेल. व्यवसायात नवे करार होतील, नवे प्रोजेक्ट्स हातात येतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला वाडवडिलांकडून आर्थिक पाठबळसुद्धा लाभू शकते. अविवाहित लोक त्यांच्या जीवनसाथीच्या शोधात असतील, त्यांना यश मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)