Jawan Movie Shahrukh Khan Bike: शाहरुख खानचा जवान सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणत आहे. निवडणुकांच्या काहीच महिन्यांआधी अगदी मोक्याच्या वेळी आलेल्या या चित्रपटात शाहरूखला ‘सुपरस्टार’ का म्हटलं जातं याचा पुरावा दिसून येतो. बाईकवरून उड्या, गाड्यांच्या छतावर मारामारी ते भन्नाट डान्स, कॉमेडी, रोमान्स सगळ्या निकषांवर हा सिनेमा खरा सिद्ध होतोय. या सिनेमात फक्त शाहरुखच नव्हे तर सर्व नयनतारा, दीपिका पदुकोण ते गिरीजा ओक पर्यंत सर्व अभिनेत्री सुद्धा भाव खाऊन गेल्या आहेत. पण आज आपण शाहरुखसह सिनेमात झळकलेल्या अशा ‘ती’ च्या विषयी जाणून घेणार आहोत जिची सध्या चांगलीच चर्चा आहे.

जवान सिनेमामध्ये शाहरुखचे कमाल ऍक्शन सीन घडत असताना येझदी अॅडव्हेंचर (Yezdi Adventure) आणि द रॉयल एनफिल्ड हिमालयन (Royal Enfield Himalayan) या दोन बाईक पाहून अक्षरशः अंगावर शहारा येतो. मोठमोठ्या कंटेनर्सना जेरीस आणणाऱ्या या बाईक फक्त ताकदीनेच नाही तर लुकने सुद्धा कमाल दिसत आहेत.

kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”
Shahrukh Khan
अभिजीत भट्टाचार्य यांनी शाहरुख खानच्या चित्रपटात गाणे बंद का केले? गायक खुलासा करत म्हणाले, “जेव्हा स्वाभिमान…”
albanian singer Dua Lipa why she included Levitating x Shah Rukh Khan mashup in her Mumbai live concert
Video: दुआ लिपा लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या गाण्यावर का थिरकली? कारण सांगत म्हणाली…
diljit dosanj shahrukh khan kkr 1
Video : दिलजीत दोसांझ भर कॉन्सर्टमध्ये बोलला असं काही की…; शाहरुख खान प्रतिक्रिया देत म्हणाला, “पाजी तू तर…”
Marathi Actor Sourabh Chougule Post
शाहरुखच्या मुलांची नावं ठळक अक्षरात, तर मराठी कलाकारांना…; ‘ते’ पोस्टर पाहून सौरभ चौघुलेचा सवाल, म्हणाला…
SRK With Alia and Ranbir Kapoor Advertisement
लग्न वाचवण्यासाठी शाहरुख खानने आलिया आणि रणबीरला दिला खास सल्ला; पाहा व्हिडीओ

तुम्हाला या बाईक कुठे दिसतील तर? एका ऍक्शन सीनमध्ये शाहरुख व त्याच्या टीमने पाच येझदी अ‍ॅडव्हेंचर्स वरून राईड केली आहे. त्यापैकी एका बाईकला साइडकार आहे. या बाईक्सचे फीचर पाहायला गेलं तर, ३३४ सीसी लिक्विड कूल इंजिनसह ही बाईक २९.८ bhp, २९.८ nm चा पीक टॉर्क देते. या बाईकसह ६ स्पीड गिअर बॉक्स जोडलेला आहे. १९८ किलोची या बाईकमध्ये १५. ५ लीटरची इंधन टाकी आहे आणि बाईक ३३. ०७ किलोमीटर प्रतितासाचा मायलेज देते असे कंपनीकडून सांगण्यात येत. The Yezdi Adventure ची किंमत २. १६ लाख रुपयांपासून ते २. २० लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.

रॉयल एनफिल्ड हिमालयन, सुझुकी व्ही-स्ट्रॉम एसएक्स आणि येझ्दी स्क्रॅम्बलर हे येझदी अॅडव्हेंचरचे टॉप पर्याय आहेत ज्यांची मुंबईत किंमत अनुक्रमे २ लाख १५ हजार, २ लाख १३ हजार व २ लाकग १० हजार अशी आहे.

शाहरुखने १९९४ नंतर पुन्हा एकत्र केलं काम..

आता वर म्हटल्याप्रमाणे शाहरुखने या बाईकसह १९९४ नंतर आता पुन्हा एकदा पहिल्यांदा काम केलं आहे. तुम्ही जर SRK चे फॅन असाल तर तुम्हाला नक्कीच लक्षात असेल १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटात सुद्धा शाहरुखन येझदी मोटारसायकल चालवत सीन केले होते. जावा कंपनीची येझदी बाईक ही शाहरुखच्या आवडत्या बाईक्सपैकी एक असल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे एका अर्थाने ‘या’ जुन्या सहकलाकारसह शाहरुखने जवानच्या निमित्ताने पुन्हा स्क्रीन शेअर केली आहे.

Story img Loader