scorecardresearch

सुप्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खानने खरेदी केली ‘ही’ लग्झरी कार, लूक-फीचर्स पाहून प्रेमात पडाल

झाकीर खानने इंस्टाग्रामवर या नवीन कारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये झाकीर त्याच्या नवीन आलिशान कारसोबत उभा आहे.

Zakir Khan Buys Range Rover Velar
झाकीर खानने 90 लाख रुपयांची रेंज रोव्हर वेलार खरेदी केली (फोटो- ZEESHAN KHAN INSTAGRAM)

Zakir Khan Brings Home Range Rover Velar SUV: सुप्रसिद्ध भारतीय स्टँड-अप-कॉमेडियन झाकीर खान तुम्हाला त्यांची वेगळी औपचारिक ओळख करून द्यायची काहीच गरजच नाही, कारण त्याचं नावच पुरेसं आहे. विशेषतः तरुण-तरुणींना त्याने पुरती भुरळ घातली आहे. आपल्या भन्नाट कॉमिक टाइमिंगमुळे त्याने असंख्य मनं जिंकली. झाकीर खानने ‘New Range Rover Velar SUV’ ही आलिशान कार खरेदी केली आहे, ज्याची किंमत सुमारे ९० लाख रुपये आहे. झाकीर खानने इंस्टाग्रामवर या नवीन कारसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये झाकीर त्याच्या नवीन आलिशान कारसोबत उभा आहे.

New Range Rover Velar SUV कशी आहे खास?

सध्या तुम्हाला झाकीर खानच्या नवीन लक्झरी SUV बद्दल सांगतो, त्यात १९९९ सीसीचे इंजिन आहे आणि ते २७३.५६ bhp पॉवर आणि ४३० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. SUV ला ८-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स तसेच ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टीम मिळते.

(हे ही वाचा : नया है यह! ‘Hyundai Aura’ आता नव्या अवतारात, पाहताच क्षणी पडाल प्रेमात, पाहा किंमत अन् फीचर्स)

New Range Rover Velar SUV वैशिष्ट्ये

रेंज रोव्हर वेलारमध्ये ३६०-डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक एअर सस्पेंशन, PM२.५ फिल्टरसह केबिन एअर आयसोलेशन, पिवी प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, ४ झोन क्लायमेट कंट्रोल, मेरिडियन साउंड सिस्टम, हेड-अप डिस्प्ले आणि एकाधिक एअरबॅग्ज यासह अनेक वैशिष्ट्ये आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 10:53 IST
ताज्या बातम्या