Tata Motors launch Curvv coupe SUV in India : गणेशोत्सव हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्यातील अनेक जण सणासुदीच्या निमित्ताने नवीन वस्तूंची खरेदी हमखास करतात. जर तुम्हीही सणासुदीला नवीन कार घेण्याचा विचार करीत असाल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतात कर्व्ह कूपे एसयूव्ही (Curvv coupe SUV) लाँच केली आहे. टाटा मोटर्सची नवीन एसयूव्ही बेसाल्ट, इतर एसयूव्ही जसे की क्रेटा, सेल्टोस, ग्रँड विटारा आणि इतरांना टक्कर देणार आहे.
किंमत :
Tata Motors ची कर्व्ह कूपे एसयूव्ही मॉडेल आठ व्हेरिएंट व सहा रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये गोल्ड एसेन्स, प्युअर ग्रे, ऑपेरा ब्ल्यू, फ्लेम रेड, प्रिस्टाइन व्हाइट व डेटोना ग्रे आदींचा समावेश असेल. तसेच याची किंमत फक्त १० लाखांपासून सुरू होणार आहे. ही किंमत टॅग ३१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी केलेल्या बुकिंगवर लागू होईल, असे देखील सांगण्यात आले आहे.
डिझाईन :
नवीन Tata Curvv च्या डिझाइन हायलाइट्समध्ये सिग्नेचर स्लोपिंग रूफलाइन, पुढच्या व मागच्या बाजूस एलईडी लाइट बार, स्प्लिट एलईडी हेडलॅम्प, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, फ्लश-फिटिंग डोअर हॅण्डल, ब्लॅक-आउट ORVM, उलटे एल-आकाराचे एलईडी टेललाइट्स आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर शार्क-फिन अँटेनादेखील असणार आहे.
पोस्ट नक्की बघा…
फीचर्स :
Tata Motors ची कर्व्ह कूपे एसयूव्हीच्या आतील भाग पॅनोरॅमिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट्स, १२.३ इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, टाटा लोगोसह चार-स्पोक स्टेअरिंग व्हील्स. तर कारच्या पुढे AC फंक्शन्स, 360 डिग्री कॅमेरा, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, तर डॅशबोर्डसाठी फॉक्स कार्बन-फायबर फिनिश, ड्राइव्ह मोड्स, रिअर एसी व्हेंट्स, पॉवर्ड टेलगेट, वायरलेस चार्जर, सिक्स वे पॉवर ॲडजेस्टेबल ड्रायव्हर सीट व त्यासाठी टच कंट्रोल्ससुद्धा दिला जाणार आहे. मागील सीट आरसी लाइन फंक्शन, इंजिन स्टार्ट-स्टॉप बटण, लेव्हल 2 एडीएएस सूट, ॲम्बियंट लायटिंग व ऑटो-डिमिंग IRVM अशा वैशिष्ट्यांसह ही गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.
टाटा कर्व्ह १.२ लिटर turbo-पेट्रोल, १.२ लिटर GDi turbo-पेट्रोल आणि १.५-लिटर डिझेल या तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. ट्रान्स्मिशन पर्यायांमध्ये सहा स्पीड मॅन्युअल व डीसीटी युनिट समाविष्ट आहे. नवीन GDi मोटर 123bhp व 225Nm टॉर्क विकसित करते. ग्राहक आठ व्हेरिएंट्समधून त्यांच्या सोईनुसार एक एसयूव्ही निवडू शकतात. स्मार्ट, प्युअर+, प्युअर+ एस, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह एस, क्रिएटिव्ह+ एस, ॲक्प्लिश्ड एस व ॲक्प्लिश्ड+ए असे हे आठ व्हेरिएंट्स असणार आहेत. तर तुम्हाला हे फीचर्स तुमच्या कुटुंबासाठी ‘बेस्ट’ वाटत असतील, तुमचा प्रवास सुरक्षित होणार असेल, तर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करू शकता.