बालमित्रांनो, भाषेतील काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार इत्यादींचे महत्त्व तुम्हाला माहीतच आहे. एखाद्या शब्दावर अनुस्वार द्यायचा राहिला किंवा अनुस्वार नको असताना तो दिला गेला तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. उदाहरणार्थ, मंदार- पांढऱ्या रुईचे झाड, मदार – उंटाच्या पाठीवर असणारा उंच भाग. खाली तुम्हाला हे शब्द शोधण्यासाठी सूचक अर्थ दिले आहेत. तुम्हाला हे शब्द शोधायला आवडेल का?