Gauri Ganpati Pujan 2023 :  आज गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस म्हणजे गौरी आगमनाचा दिवस. अनेक घरांमध्ये गौरी-गणपती असतात. गणपतीच्या जन्मकथा, गणेश चतुर्थी का साजरी करतात, यासंदर्भात आपण काही कथा वाचल्या आहेत. पण, गौरी म्हणजे काय ? गौरी का आणल्या जातात ? गौरी-गणपती प्रथा का सुरू झाली ? किती प्रकारच्या गौरी असतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल…

गणपतीचे दिवस म्हणजे उत्साह, आनंद यांचा सुरेख मेळ असतो. गणपतीच्या आगमानानंतर साधारणत: तिसऱ्या दिवशी गौरी पूजनाची परंपरा आहे. माहेरवाशीण म्हणून, तर काही घरांमध्ये गणपतीची आई म्हणून पूजतात, तर अनेक ठिकाणी ज्येष्ठा-कनिष्ठा अशा बहिणींच्या स्वरूपात पूजल्या जातात. पण मुळात गणेश चतुर्थीमध्ये गौरी का पुजल्या जातात, त्यामागील आख्यायिका समजून घेणे रंजक आहे.

flamingos and over 50 migratory Birds arrive at Suryachiwadi Lake
साताऱ्यातील जलाशयात ‘परदेशी पाहुणे’ दाखल; रोहित, पट्टेरी राजहंससह ५० हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Manja is deadly for birds Firefighters rescue 160 birds in four years
पक्ष्यांसाठी मांजा जीवघेणा! चार वर्षांत अग्निशामक दलाकडून १६० पक्ष्यांची सुटका
Why do dogs eat grass
तुमचाही श्वान सतत गवत खातो? तो आजारी तर नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Do butterflies sleep at night
माणसांप्रमाणे फुलपाखरंही रात्री झोपतात का? जाणून घ्या रंजक माहिती…
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
The reason Behind Flying Kites on Makar Sankranti
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? काय आहे कारण, जाणून घ्या
butterfly
बालमैफल : आमच्या खिडकीतलं फुलपाखरू

हेही वाचा : गणपतीला बाप्पा का म्हणतात ? काय आहे ‘बाप्पा’ शब्दामागील कथा…

हेही वाचा : गणपतीचे वाहन उंदीर का आहे? मोर हे गणेशाचे वाहन होते का ? जाणून घ्या कथा…

गौरी म्हणजे काय ?

संस्कृत शब्दकोशानुसार, ‘गौरी’ म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात अशी पवित्र कन्या होय. तसेच गौरी म्हणजे पार्वती ( शंकराची पत्नी), गौरी म्हणजे पृथ्वी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत. या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते. विदर्भ प्रांतात गौरीला महालक्ष्मी म्हणतात व तो सर्वार्थाने रुढ शब्द सबंध महाराष्ट्रात पूर्वापार वापरला जातो. लक्ष्मी ही विष्णूपत्नी, तर महालक्ष्मी ही महादेव पत्नी पार्वती होय, असाही समज आहे. या महालक्ष्मीला ज्येष्ठा गौरी म्हणून संबोधले जाते. पुराण ग्रंथांनुसार गणेश चतुर्थी आणि गौरी हे खरेतर व्रत आहे. कालांतराने या व्रतांना सणाचे स्वरूप प्राप्त झाले. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.

हेही वाचा : गणपतीचा जन्म कधी झाला ? जाणून घ्या गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीमध्ये फरक….

गौरी का आणतात ?

हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या पत्नीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई, असे सांगितले आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या. ही पूजा भाद्रपद शुद्ध पक्षात केली जाते.

हेही वाचा : श्रीगणेशाला का प्रिय आहेत दुर्वा-शमी आणि मंदार ? गणपतीचा आणि पत्रींचा संबंध काय ?

गौरी आणण्याच्या परंपरा…

ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून ३ दिवस राहणाऱ्या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरुन सजावट केली जाते. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याचीही रित असते. काही जणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. काहींकडे तिखटाचा नैवेद्य दाखवतात.
ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये १६ भाज्या, ५ कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. यादिवशी सवाष्ण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचीही पद्धत आहे. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून आल्याने त्यांना खाण्यासाठी लाडू, चिवडा, करंज्या असे फराळाचे पदार्थ, मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. तसेच गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. संध्याकाळी नातेवाईक, शेजारी आणि मित्र-मैत्रिणींना हळदी-कुंकवासाठी आणि गौरींचे दर्शन घेण्यासाठी बोलविण्यात येते.

ओवसणे (वंसा) म्हणजे काय ?

अलिबाग तालुका आणि त्यापुढे दक्षिणेस दक्षिण रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या भागात हा सुपे ओवसणे ही प्रथा आहे. ही प्रथा दरवर्षी होत नसून ज्या वर्षी पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन होते त्याच वर्षी ही सुपे ओवसली जातात. नारळ, पोफळ, भात, मीठ, भाजीपाला पिकविणारा कोकणचा भाग म्हणजे आगर. आगरात वरील समाजामध्ये लग्न झाले की नववधूकडील मंडळी या ओवशाची वाट पाहतात. नव्या सुपात चोळखण वगैरे पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे सणाचे पदार्थ-मोदक, करंजा, लाडू वगैरे घेऊन नवी साडी चोळी लेवून नववधू ते सूप डोक्यावर घेऊन गौरीचे पूजन झाले की गौरीजवळ जाऊन ते भरले सूप गौरीसमोर धरून वरून खाली अशाप्रकारे पाच वेळा करते याला सूप ओवसणे (ओवाळणे) म्हणतात. अशी ओवसलेली कमीत कमी पाच सुपे डोक्यावर घेऊन (पूर्वी अनवाणी) चालत, बरोबर कमीत कमी पाच सवाष्ण घेऊन ती सासरी जाते. सासरी यास सुपांचा ओवसा आला म्हणतात. हा आला ओवसा सासरी स्वीकारला जातो.

गौरी हा खरंतर माहेरवाशीण, मुलींना सांस्कृतिक अधिष्ठान मिळवून देणारा सण आहे.

Story img Loader