scorecardresearch

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर भाजपाचा डोळा? मुंबई भाजपातर्फे वरळीत मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन

मुंबई भाजपाचे अध्यक्ष झालेल्या आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मुंबई भाजपातर्फे मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत सचिन अहिर आणि शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर भाजपाचा डोळा? मुंबई भाजपातर्फे वरळीत मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघावर भाजपाचा डोळा? मुंबई भाजपातर्फे वरळीत मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन

आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात भाजपाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे तेही जांबोरी मैदानात. एकेकाळी जांबोरी मैदान आणि दंहीहंडीचे मेगा आयोजन असं सचिन अहिर यांच्याबाबतीत एक समीकरण तयार झालं होतं. मुंबईतील सर्वात मोठी आणि विविध मोठ्या बक्षिसांसाठी सचिन अहिर यांनी आयोजित केलेला जांबोरी मैदानातला दहीहंडी उत्सव ओळखला जायचा. पण यावेळी हे मैदान आधी बुक करत भाजपाने बाजी मारली आहे.

भाजपाच्या आमादरांतर्फे विविध ठिकाणी दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जात आहे. यामध्ये काही वर्षांपूर्वी मुंबई भाजपाचे अध्यक्ष असतांना आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातला दहीहंडी उत्सव एक आकर्षण ठरला होता. आमदार राम कदम यांचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन हे एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष झालेल्या आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मुंबई भाजपातर्फे मेगा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत सचिन अहिर आणि शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आमदार सचिन अहिर यांना दहिहंडी उत्सवासाठी दुसरी जागा शोधावी लागली आहे.

हेही वाचा … Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

यानिमित्ताने वरळीत ताकद दाखवण्याचा आणि मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. या मतदारसंघात भाजपाची मर्यादीत का होईना ताकद असून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत लक्षणीय मते भाजपाच्या उमेदवाराला मिळाली होती. तेव्हा दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत आधी पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त वॉर्ड आणि नंतर वरळी विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपाने प्रयत्न करायला सुरुवात केल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०२२ ( Bmc-elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mega dahi handi festival organized by mumbai bjp in aditya thackerays worli assembly constituency asj