लीना भंगाळे

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, प्रश्नवेध मालिकेत आपण यापूर्वी यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर एक मधील घटकांची चर्चा केली. यूपीएससी पूर्वपरीक्षा २ जून रोजी आहे. त्यामुळे आजपासून आपण या सदरात पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील उपघटकांची परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात चर्चा करणार आहोत.

प्र. १) खालील विधानांचा विचार करा.

१)   स्वदेश सेवक होम गदर चळवळीच्या स्थापनेशी संबंधित होते.

२)   भारताच्या स्वातंत्र्यलढय़ासाठी मदत करावी, यासाठी जर्मन सरकारची मनधरणी करण्याकरिता बर्लिन समितीची स्थापना करण्यात आली होती.

यापकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

पर्याय –  अ) फक्त १

ब) फक्त २   क) १ व २ दोन्हीही

ड) १ व २ दोन्हीही नाही

उत्तर : अ) फक्त १

स्पष्टीकरण : झिमरमन योजनेअंतर्गत जर्मनीच्या परराष्ट्र विभागाच्या मदतीने वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त यांनी १९१५मध्ये बर्लिन समितीची स्थापना केली होती. परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांना संघटित करून भारतात स्वयंसेवक व शस्त्रास्त्रे पाठवून तेथील भारतीय सनिकांमध्ये बंड घडवून आणणे व देश स्वतंत्र करण्यासाठी लष्करी हल्ल्याची तयारी करणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते.

प्र. २) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाबाबत खालील विधानांचा विचार करा.

१) असहकार चळवळीच्या कार्यक्रमाला या अधिवेशनात मान्यता देण्यात आली.

२) काँग्रेसने आपला कृतीकार्यक्रम वैधानिक लढय़ापासून अतिरिक्त वैधानिक लोकलढय़ात

बदलला.

३) भाषिक आधारावर काँग्रेस प्रांतिक समित्या संघटित करण्यात आल्या.

यापकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

पर्याय – अ) फक्त १ व ३

ब) फक्त २ व ३  क) फक्त ३

ड) वरीलपकी सर्व

उत्तर : ड) वरीलपकी सर्व

स्पष्टीकरण : १९२०चे नागपूर अधिवेशन प्रसिद्ध आहे. कारण, यात असहकार चळवळीच्या कार्यक्रमाला मान्यता देण्यात आली. गांधींनी घोषित केले की, असहकार चळवळीचा कार्यक्रम जर संपूर्णरीत्या राबविण्यात आला, तर एक वर्षांच्या आत स्वराज्य मिळेल.

प्र. ३) यापकी कुणी असहकार चळवळीत सहभाग घेतला नाही ?

१) लाला लजपत राय

२) मोहंमद अली जीना

३) सफुद्दीन किशलू

४) अ‍ॅनी बेझंट

५) जवाहरलाल नेहरू

पर्याय : अ) २,३,५    ब) १,२,४   क) १,३,५   ड) २,४,५

उत्तर : क) १,३,५

स्पष्टीकरण : संवैधानिक लढय़ावर विश्वास असल्यामुळे १९२०च्या नागपूर अधिवेशनानंतर मोहम्मद अली जीना, अ‍ॅनी बेझंट व बी. सी. पाल यांनी काँग्रेस सोडली. तर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यासारख्या मंडळींनी ‘द इंडियन नॅशनल लिबरल फेडरशन’ ची स्थापना केली.

प्र. ४) राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्याच्या (१८५७) अनुषंगाने पुढील कुठली विधाने बरोबर आहेत?

१)   राणी व्हिक्टोरियाला ब्रिटिश भारताची सम्राज्ञी घोषित करण्यात आले.

२)   धार्मिक बाबतीत ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

३)   ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापार नियंत्रित करण्यात आला.

४)   उर्वरित भारतीय राज्यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पर्याय : अ) फक्त १ व २

ब) फक्त १  क) फक्त १, २ व ४

ड) वरीलपकी सर्व

उत्तर : अ) फक्त १ व २

स्पष्टीकरण : जाहीरनाम्याने ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आणला आणि सम्राज्ञीला भारताची सर्वोच्च शासक म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे तिसरे विधान चुकीचे आहे. या जाहीरनाम्याने संस्थानांचे अधिकार आणि प्रतिष्ठा यांचा आदर करण्याचे वचन देण्यात आले. त्यामुळे चौथे विधानही चुकीचे ठरते. त्याने धार्मिक उदारता अवलंबण्याचे वचन देत पूर्वापार चालत आलेल्या प्रथा-परंपरांनुसार राज्यकारभार करण्याचे आश्वासन दिले.

प्र. ५) १८५९ च्या नीळ उत्पादकांच्या बंडाबाबत खालीलपकी कुठली विधाने योग्य आहेत?

१)   नीळ उत्पादकांचा संताप प्रामुख्याने परकीय मळेवाल्यांविरोधात होता.

२) सिदो आणि कान्हू हे प्रमुख बंडखोर नेते होते.

३) बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले ‘नीलदर्पण’ हे नाटक शेतकऱ्यांचे शोषण दाखवते.\

४) ‘हिंदू पॅट्रियट’ नामक साप्ताहिकाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.

पर्याय : अ) फक्त १ व ३

ब) फक्त १ व ४  क) फक्त १, २ व ४  ड) वरीलपकी सर्व

उत्तर : ब) फक्त १ व ४

स्पष्टीकरण : दुसरे विधान चुकीचे आहे. कारण, बंडाचे नेतृत्व दिगंबर बिस्वास व बिष्णू बिस्वास यांनी केले. तिसरेही विधान चुकीचे आहे. कारण, ‘नीलदर्पण’ दीनबंधू मित्र यांनी लिहिले.

प्र. ६) आर्य समाजाबाबत पुढीलपकी कोणती विधाने चुकीची आहेत?

१) मूर्तिपूजा आणि बहुधर्मवादावर टीका केली.

२) विधवा पुनर्वविाहाचा कठोर विरोध केला.

३) शुद्धीची संकल्पना विकसित केली.

४) गोरक्षेचा मुद्दा हाती घेतला.

पर्याय : अ) फक्त २    ब) फक्त १ व २   क) फक्त १,२ व ३     ड) फक्त ४

उत्तर : अ) फक्त२

स्पष्टीकरण : दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. मूर्तिपूजा, बहुधर्मवाद, बालविवाह, विधवा, ब्रम्हचर्य, ब्राम्हणांचे वर्चस्व आणि जातव्यवस्था या प्रचलित हिंदू रीतींवर आर्य समाजाने कठोर टीका केली. वेदांवर आधारित प्राचीन भारतीय धर्माचा त्यांनी पुरस्कार केला.