महेश कोगे
राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्वच परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकाची तयारी आणि सराव यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. या लेखामध्ये चालू घडामोडीबाबतचे सराव प्रश्न देण्यात येत आहेत.
प्रश्न १ – पुढीलपकी कोणती विधाने योग्य आहेत?
अ) महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राजवटी लागल्या आहेत.
ब) १९७८ मध्ये पुलोदचे सरकार बरखास्त झाल्यामुळे पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागली होती.
क) २०१४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.
ड) राज्यांमध्ये राष्ट्रपती राजव)ट कलम ३५२ नुसार लावली जाते.
पर्याय
१)अ,ब,क २)अ, क
३) अ,क, ड ४) वरीलपैकी सर्व
प्रश्न २ – आयएनएस खांदेरीबाबत कोणती गोष्ट खरी आहे?
अ) ही फ्रान्सच्या डीसीएनएसच्या साहाय्याने सुरू असलेल्या प्रोजेक्ट ७४ या प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत आहे.
ब) ही पाणबुडी २८ जुल २०१९ रोजी नौदलात दाखल झाली .
क) फ्रान्सची मेसर्स डीसीएनएस कंपनी आणि माझगाव गोदी यांनी संयुक्तरीत्या या पाणबुडीची बांधणी केली आहे.
ड) ही कलवरी श्रेणीतील पाणबुडी नाही.
प्रश्न ३ – भारत, अमेरिका आणि जपान नौदलादरम्यानचा पुढीलपकी कोणता त्रिपक्षीय सागरी सराव आहे.
अ) सागर २०१९
ब) अपेक्स २०१९
क) काझाइंड २०१९
ड) मलबार २०१९
प्रश्न ४ – योग्य जोडय़ा लावा.
अ)जागतिक कर्करोग जागृती दिन I) ८ नोव्हेंबर,
ब) राष्ट्रीय बाल दिन II) २६ नोव्हेंबर
क) संविधान दिन III) १४ नोव्हेंबर
ड) जागतिक रेडिओग्राफी दिन IV) ७ नोव्हेंबर
अ ब क ड
१) IV I II III
२) III IV II I
३) IV III II I
४) IV II I III
प्रश्न ५ – उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांना कोमोरोस या देशाच्या पुढीलपकी कोणत्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
१)ऑर्डर ऑफ द ग्रीन क्रीन्सेंट
२) ऑर्डर ऑफ द केमोरोस
३)ऑर्डर ऑफ द ग्रीन कोमोरोस
४) ऑर्डर ऑफ द रिष्ट्रीत
प्रश्न ६ – २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळणारे अभिजीत बॅनर्जी आणि एस्थर डफलो यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) अभिजीत बॅनर्जी भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ज्ञ आहेत.
ब) अर्थशास्त्राचे नोबेल मिळवणाऱ्या एस्थर डफलो या द्वितीय महिला असून सर्वात तरुण विजेत्या आहेत.
क) अभिजीत बॅनर्जी हे अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे भारतीय मूळ असलेले प्रथम व्यक्ती आहेत.
ड) वैश्विक गरिबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर त्यांनी केलेल्या संशोधनासाठी हा सन्मान देण्यात आला.
पर्याय
१)वरीलपैकी सर्व
२) अ,ब,ड
३) अ,ब,क
४) अ,ड
प्रश्न ७ – अलीकडे शोडोल नृत्याची गिनीज बुक ऑफ
वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. ते भारतातील कोणत्या प्रदेशातील नृत्य आहे.
१) लडाख
२) त्रिपुरा
३) श्रीनगर
४) हिमाचल प्रदेश
उत्तरे आणि स्पष्टीकरणे
प्रश्न १ – योग्य पर्याय क्र. – २
राज्यात लागू झालेली ही तिसरी राष्ट्रपती राजवट आहे. यापूर्वी १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी शरद पवार यांचे पुलोदचे सरकार बरखास्त केल्यावर आणि २०१४ मध्ये राष्ट्रवादीने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ही राजवट घटनेच्या कलम ३५६ नुसार लावली जाते.
प्रश्न क्र. २ – योग्य पर्याय क्र.- ३
आयएनएस खांदेरी फ्रान्सच्या डीसीएनएसच्या साहाय्याने सुरू प्रोजेक्ट ७५ या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आली असून २८ सप्टेंबर २०१९ रोजी नौदलात दाखल झालेली आत्याधुनिक कलवरी श्रेणीतील पाणबुडी आहे.
प्रश्न क्र. ३ – योग्य पर्याय क्र. ४
मलबार १०२९ हा भारत अमेरिका आणि जपानच्या नौदलादरम्यांनचा त्रिपक्षीय सागरी सराव आहे. हा सराव जपानच्या समुद्रकिनाऱ्यानजीक सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू झाला.
प्रश्न क्र. ४ – योग्य पर्याय क्र. ३
१) जागतिक कर्करोग जागृती दिन – ७ नोव्हेंबर
२) राष्ट्रीय बाल दिन – १४ नोव्हेंबर
३) संविधान दिन – २६ नोव्हेंबर
४) जागतिक रेडिओग्राफी दिन – ८ नोव्हेंबर
प्रश्न क्र. ५ – योग्य पर्याय क्र. १
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडूंना कोमोरोसच्या ऑर्डर ऑफ द ग्रीन क्रीन्सेंट या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.
प्रश्न क्र. ६ – योग्य पर्याय क्र. २
अभिजीत बॅनर्जी हे अर्थशास्त्रात नोबेल मिळवणारे भारतीय मूळ असलेले द्वितीय व्यक्ती आहेत. त्यांच्याआधी अमर्त्य सेन (१९९८) यांना अर्थशास्त्रातील नोबेल प्रदान करण्यात आले होते.
प्रश्न क्र. ७ – योग्य पर्याय क्र.१
शोडोल नृत्याची सर्वात मोठे सामूहिक लडाखी नृत्य म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. हे लडाखचे शाही नृत्य म्हणून ओळखले जाते.