आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाचे नेमके स्वरूप आणि त्यातील करिअर संधींची सविस्तर माहिती –
आíकटेक्चर अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढत आहे. या अभ्यासक्रमाची निवड करताना काही गोष्टींची माहिती असणे अत्यावश्यक असते.
शैक्षणिक पात्रता
आíकटेक्चरचा अभ्यासक्रम करण्यासाठी कौन्सिल ऑफ आíकटेक्चरच्या निकषानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी १० + २ असा नवीन अभ्यासक्रम गणित या विषयासह यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे अथवा ज्या विद्यार्थ्यांनी १० + ३ असा पदविका अभ्यासक्रम किमान ५० टक्के गुण मिळवून यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे, ते विद्यार्थी आíकटेक्चरच्या प्रवेश परीक्षेसाठी शैक्षणिकदृष्टय़ा पात्र समजले जातात
प्रवेश परीक्षा : नाटा
नॅशनल अॅप्टिटय़ूड टेस्ट इन आíकटेक्चर (एनएटीए म्हणजेच नाटा) ही प्रवेशपरीक्षा विद्यार्थ्यांना उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. ही परीक्षा राज्य पातळीवर तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे दरवर्षी घेतली जाते. या वर्षीच्या आíकटेक्चरच्या प्रथम वर्षांचे प्रवेश केवळ नाटा परीक्षेतील गुणांवर देण्यात येणार आहेत. या परीक्षेची सविस्तर माहिती http://www.nata.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यंदाच्या प्रवेशपरीक्षाच्या तारखा आणि टप्पे पुढीलप्रमाणे आहेत-आíकटेक्चरच्या प्रथम वर्ष २०१४-१५च्या प्रवेशासाठी नॅशनल अॅप्टिटय़ूड टेस्ट इन आíकटेक्चर (एनएटीए म्हणजेच नाटा) या परीक्षेचा पहिला टप्पा दिनांक १४ मार्च ते २५ मे दरम्यान आणि दुसरा टप्पा १ जून ते ३१ ऑगस्ट दरम्यान कौन्सिल ऑफ आíकटेक्चरने मान्यता दिलेल्या परीक्षा केंद्रांवर घेतल्या जात आहेत.
आवश्यक कौशल्ये
 व्हिज्युअल स्पॅटियल इंटेलिजन्स (पिक्चर स्मार्ट) या प्रकारची बुद्धिमत्ता जास्त असलेल्या व्यक्तींना संकल्प चित्रकृती, संरचना, सजावट, नकाशे, चित्रे, रंगसंगती या बाबतचे कला-कौशल्य अधिक असते. आíकटेक्ट, इंटिरियर डिझायनर, फोटोग्राफर, लँडस्केप व गार्डन डिझायनर, फॅशन डिझायनर, पेंट आर्टस्टि किंवा डिझाइन इंजिनीअर्स होण्यासाठी हे सर्व गुण अंगी असणं आवश्यक असतं. अशा व्यक्तींना कोणत्याही कलाविषयक क्षेत्रात गती प्राप्त होत असते. ग्राफिक डिझायनर, थ्री डी अॅनिमेटर, सिने-नाटय़ दिग्दर्शक, आर्ट डायरेक्टर, सेट डिझायनर, प्रॉडक्ट डिझायनर इत्यादी विविध कल्पकतेने नटलेल्या कलाप्रांतात अशा व्यक्तींचा उत्कर्ष होतो.    
कालावधी
हा पाच वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून तो पूर्ण केल्यानंतर बॅचलर ऑफ आíकटेक्चर अशी पदवी संबंधित विद्यापीठाकडून बहाल केली जाते.  

अभ्यासक्रमातील विषय
आíकटेक्चरच्या अभ्यासक्रमाच्या पाच वर्षांच्या कालावधीत बेसिक डिझाइन, बििल्डग कन्स्ट्रक्शन व मटेरियल, ग्राफिक्स, आíकटेक्चरचा इतिहास, स्ट्रक्चर, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन इन आíकटेक्चर, कॉन्स्टिटय़ूूशन लॉं, आíकटेक्चरल डिझाइन, सव्र्हेइंग, लेव्हिलग, व्हिज्युअल आर्ट, बििल्डग स्ट्रक्चर, बििल्डग सíव्हसेस, वìकग ड्रॉइंग, अलाइड स्ट्रक्चर्स, टाऊन प्लॅिनग, एस्टिमेटिंग, कॉिस्टग, लँडस्केप आíकटेक्चर, इंटिरियर डिझाइन, अर्थक्वेक रेझिस्टंट आíकटेक्चरल डिझाइन, इलेक्टिव्ह, डिझाइन फंडामेंटल्स ऑफ आíकटेक्चर, आíकटेक्चरल ड्रॉइंग व ग्राफिक्स, थेअरी ऑफ स्ट्रक्चर, मॉडेल मेकिंग, एन्व्हायरॉन्मेंटल सायन्स, टेक्निकल कम्युनिकेशन, स्पेसिफिकेशन रायटिंग, प्रोफेशनल ट्रेिनग अशा अनेकविध विषयांचा अभ्यास करता येतो.
मूल्यांकन
आíकटेक्चरच्या अभ्यासक्रमात पाच वर्षांच्या कालावधीत सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन केले जाते. संपर्क सत्रांसाठी जास्तीत जास्त उपस्थिती तसेच प्रॅक्टिकल असाइनमेंट वेळेवर पूर्ण केल्यास केवळ थिअरीचा थोडा जास्त अभ्यास करणे आवश्यक ठरते. आíकटेक्चरचा अभ्यास करत असताना आíकटेक्टच्या कार्यालयात व्यावसायिक तसेच प्रात्यक्षिक स्वरूपाच्या कामाचा तसेच शिक्षणाचा अनुभव मिळतो. हा एक अभ्यासक्रमाचाच भाग असून तो दिलेल्या कालावधीत पूर्ण करणे अनिवार्य असते.
उपलब्ध व्यावसायिक पर्याय
आíकटेक्चरचे शिक्षण पूर्ण केल्यावर कौन्सिल ऑफ आíकटेक्चरकडून नोंदणी दाखला मिळवणे अनिवार्यच नाही, तर बंधनकारक असते. आíकटेक्चर पूर्ण केल्यानंतर सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये नोकरी मिळू शकते. सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य, इरिगेशन. टाऊन प्लॅिनग, पालिका कार्यालये, गृहनिर्माण संस्था, शासकीय व खासगी तसेच आíकटेक्टच्या ऑफिसमध्ये अशा विविध करिअर संधी उपलब्ध होतात. पदानुसार कामाच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांची पात्रता यावर निवड ठरत असते. इंटिरियर डिझायनर म्हणूनही व्यवसाय करता येऊ शकतो. स्वत:चा व्यवसाय करण्याचा मार्गही उपलब्ध असतो. कौन्सिल ऑफ आíकटेक्चरचे http://www.coa.gov.in  हे अधिकृत संकेतस्थळ असून त्यावर व्यावसायिक नियमांची सविस्तर माहिती उपलब्ध आहे.  
व्यवसायाचे स्वरूप
आíकटेक्ट म्हणून विविध सेवा देणे आवश्यक असते. जागा मालकाच्या गरजेनुसार आणि अपेक्षेप्रमाणे प्राथमिक स्वरूपाचे संरचनात्मक नकाशे बनवून देणे, जागेचे आकार व आकारमान लक्षात घेऊन स्थानिक पालिका पातळीवरील नियमनांनुसार नकाशे बनवून सदर पालिका अधिकारी व्यक्तींकडून योजनांना आणि एकूणच कामांना मान्यता मिळवणे, साइट डेव्हलपमेंट, स्ट्रक्चरल डिझाइन, सॅनिटरी, प्लम्बिंग, ड्रेनेज, पाणीपुरवठा व सेवरेज डिझाइन, रेन-वॉटर हार्वेिस्टग, वेिंन्टलेशन, ग्लोबल वॉìमग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, एअरकंडिशिनग डिझाइन आणि इतर मेकॅनिकल सिस्टम्स, एलेवेटेर्स, एस्कलेटर्स,
फायर डिटेक्शन, फायर सिक्युरिटी, लँडस्केप, इंटिरियर, ग्राफिक डिझाइन अशा अनेकविध कामांत आíकटेक्टला सहभागी व्हावे लागते.  
मोठी शहरे, विकसनशील गावे, रिअल इस्टेट, इमारतीइंडस्ट्री, बिल्डर्स, आíकटेक्टचे कार्यालय, ज्या ठिकाणी विकासाची
कामे सुरू आहेत अशा सर्वच ठिकाणी आíकटेक्टची आवश्यकता भासते. आíकटेक्चरचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तींसाठी संधीची अनेक दारे खुली होतात. नोकरी करणाऱ्यांना सुरुवातीला सुमारे १५ ते ५० हजार रुपये मासिक वेतन  
मिळू शकते.
पदव्युत्तर शैक्षणिक पर्याय
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (जनरल)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (आíकटेक्चरल कॉन्झव्र्हेशन)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (अर्बन डिझाइन)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (इंटिरियर आíकटेक्चर)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (लँडस्केप आíकटेक्चर)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (हाऊसिंग)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (ट्रान्सपोर्टेशन प्लािनग)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (सस्टेनेबल ह्य़ुमन हॅबिटेट)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (सस्टेनेबल आíकटेक्चर)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (एनव्हायर्नमेंटल आíकटेक्चर)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (कॉम्प्युटर अॅप्लिकेशन)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर    (व्हॅल्यूएशन अँड अर्बट्रिेशन)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर    (बििल्डग ऑटोमेशन)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर    (रूरल आíकटेक्चर)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर    (रीजनल आíकटेक्चर)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर    (इंटरनॅशनल आíकटेक्चर)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (आíकटेक्चर अँड कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर    (डिजिटल आíकटेक्चर)
* मास्टर ऑफ आíकटेक्चर (कॉम्प्युटर एडेड आíकटेक्चरल डिझाइन)