भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), गाझियाबाद यांनी विविध शाखांमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. सर्व इच्छुक उमेदवार १५ नोव्हेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइटद्वारे BEL शिकाऊ भरती २०२१ साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाली आहे.

या प्रक्रियेद्वारे एकूण ८० पदांची भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या २० पदे, कॉम्प्युटर सायन्सच्या २० पदे, इलेक्ट्रॉनिक्सच्या २० पदे आणि मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट आणि सेक्रेटरीयल प्रॅक्टिसच्या २० पदांचा समावेश आहे. शिकाऊ उमेदवारांच्या या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. १०४०० स्टायपेंड दिले जाईल.

( हे ही वाचा: MHT CET Result 2021: निकालाची ‘ही’ आहे अपेक्षित तारीख; जाणून घ्या अधिक तपशील)

पात्रता काय?

अधिकृत अधिसूचनेनुसार, शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने AICTE किंवा भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त शाखेत डिप्लोमा असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०२१ रोजी २३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, सरकारी नियमांनुसार SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत ५ वर्षे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट असेल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

( हे ही वाचा: वडिलांच्या मृतदेहासमोरच तरुणीने केलं ग्लॅमरस फोटोशूट; युजर्सनी फटकारलं )

कशी असेल निवड प्रक्रिया?

निवड प्रक्रियेबद्दल बोलताना, या पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांची निवड डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. त्यानंतर त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी सूचित केले जाईल. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट mhrdnats.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइट तपासा.

( हे ही वाचा: SSC GD Constable Exam 2021: एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षेचा अर्ज फॉर्म स्टेटस जारी )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रकल्प अभियंता पदांच्या ८८ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. सर्व इच्छुक उमेदवार BEL भरती 2021 साठी अधिकृत वेबसाइट द्वारे २७ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात