NIRRH Mumbai Recruitment 2021: ‘या’ पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या पगार आणि पात्रता निकष

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे तीन पदांकरिता भरती करण्यात येत आहे.

lifestyle
प्रकल्प तांत्रिक अधिकारी या पदावर भरती झाल्यास ३२,००० रुपये प्रतिमहिना पगार मिळणार.

सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांना आता आणखीन एक संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई येथील राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान (NIRRH Mumbai Recruitment 2021) येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई येथे तीन पदांकरिता भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ आणि १९ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

या पदांकरिता भरती

– प्रकल्प तांत्रिक अधिकारी

– संशोधन सहाय्यक

– प्रकल्प तंत्रज्ञ III

भरतीकरिता शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्रकल्प तांत्रिक अधिकारी (Project Technical Officer) या पदाकरीता सोशल सायन्समध्ये पदवी आणि पदव्युत्तर डिग्री असणे आवश्यक आहे.

संशोधन सहाय्यक (Research Assistant) या पदासाठी लाइफ सायन्समध्ये पदव्युत्तर डिग्री असणे आवश्यक आहे.

प्रकल्प तंत्रज्ञ III (Project Technician III) या पदकरीता मेडिकल लेबॉरेटरी टेक्निशियनचा डिप्लोमा आणि या क्षेत्रात कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

या पदांवर भरती झाल्यास मिळणार इतका पगार

– प्रकल्प तांत्रिक अधिकारी या पदावर भरती झाल्यास ३२,००० रुपये प्रतिमहिना पगार मिळणार.

– संशोधन सहाय्यक या पदाकरिता प्रतिमहिना १४,००० रुपये पगार मिळणार.

– प्रकल्प तंत्रज्ञ III या पदाकरिता प्रतिमहिना १८,००० रुपये पगार मिळणार.

* पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी projectappli.nirrh.res.in या संकेतस्थळाला भेट द्या.

* अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ आणि १९ सप्टेंबर २०२१ असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nirrh mumbai recruitment 2021 openings for different posts scsm

ताज्या बातम्या