ISRO Recruitment :सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांकरिता एक चांगली बातमी आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी इस्रो मोठी संधी उपलब्ध करून देत आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने इस्रोच्या अधिकृत वेबसाईटवर isro.gov.in अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पदांसाठी भरती –

या भरती मोहिमेद्वारे, पात्र उमेदवारांची ज्युनियर रिसर्च फेलो (JRF), संशोधन वैज्ञानिक (RS), प्रोजेक्ट असोसिएट-I आणि प्रोजेक्ट सायंटिस्ट-I च्या ३४ रिक्त पदांवर भरती केली जाईल. वेगवेगळ्या पदांसाठी अर्जाच्या अटीही वेगवेगळ्या आहेत. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे, अधिक तपशीलांसाठी भरती अधिसूचना पहा. पदवीधर उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक ७ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

कसा कराल अर्ज –

  • अधिकृत वेबसाइट nrsc.gov.in ला भेट द्या.
  • होमपेजवर उपलब्ध ‘करिअर्स’ टॅबवर क्लिक करा.
  • आता ‘रिक्रूटमेंट ऑफ रिसर्च पर्सनल’ साठी लिंक उघडा.
  • अर्ज भरा आणि सबमिट करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
  • भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.

हेही वाचा – IRCTC मध्ये १७६ पदांसाठी भरती! थेट मुलाखतीद्वारे मिळवा भारतीय रेल्वेत नोकरी, पाहा अर्ज करण्याची प्रक्रिया

या भरतीसाठी केवळ पदवीधर उमेदवारच अर्ज करू शकतात. जे उमेदवार सध्या पदवीच्या अंतिम वर्षात बसत आहेत ते अर्ज करण्यास पात्र नाहीत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government job opportunities in isro apply now srk
First published on: 03-04-2023 at 18:54 IST