MSBSHSE 10th Result Live Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार आज २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. प्राप्त माहितीनुसार mahahsscboard.in वर ऑनलाईन निकाल जाहीर झाला. याशिवाय mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर देखील निकाल उपलब्ध असणार आहे.

राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकत होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. आज २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

russion yutuber harrassed by indian man
“तू खूप सेक्सी आहेस, माझं स्वप्न…”; भारतीय तरुणाकडून रशियन युवतीचा विनयभंग, VIDEO व्हायरल
pigmentation
Health Special: पिगमेंटेशन म्हणजे काय?
क्षमस्व, तात्याराव!
आम्लपित्तावर आयुर्वेदिक उपाय
Live Updates

Maharashtra Board SSC 10th Result 2023 Live Updates: दहावीच्या निकालाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

17:39 (IST) 2 Jun 2023
दहावीची मार्कशीट शाळेत कधी मिळणार?

महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनायलने दहावीच्या निकालानंतर मार्कशीट मिळण्याबाबत सुद्धा माहिती दिलेली आहे. यानुसार १४ जून ला शाळेत विद्यार्थ्यांना त्यांची मार्कशीट मिळवता येईल.

15:20 (IST) 2 Jun 2023
SSC Result 2023: दररोज दोन ते तीन तास अभ्यास करून पुण्यातील स्वराली राजपूरकरला दहावीच्या परीक्षेत मिळाले १०० टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.

सविस्तर वाचा

15:18 (IST) 2 Jun 2023
Maharashtra SSC Result 2023: ठाणे जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींची बाजी, यंदा ९३.६३ टक्के इतका जिल्ह्याचा निकाल

दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा ९३.६३ टक्के लागला आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३८ टक्के इतके आहे. परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तरी निकालात मात्र मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा

13:03 (IST) 2 Jun 2023
दहावीचा निकाल जाहीर! इथे पाहा रिझल्ट, 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट (Official website to check 10th result)

१) http://www.mahresult.nic.in

२) http://sscresult.mkcl.org

३) https://ssc.mahresults.org.in

SSC Result 2023 : असा पहा १०वी चा निकाल ( SSC Result 2023: How to check 10th Result)

१) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.

२) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा. (आईचे नाव)

४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

५) निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.

12:29 (IST) 2 Jun 2023
दहावीच्या निकालात १५१ विद्यार्थ्यांना १०० टक्के मार्क; पाहा विभागनिहाय आकडेवारी

१०० टक्के मार्क मिळवले विभागीय विद्यार्थी संख्या

पुणे: ५

औरंगाबाद: २२

मुंबई: ६

अमरावती: ७

लातूर: १०८

कोकण: ३

12:14 (IST) 2 Jun 2023
दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट इथे पाहा

दहावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट (Official website to check 10th result)

१) http://www.mahresult.nic.in

२) http://sscresult.mkcl.org

३) https://ssc.mahresults.org.in

11:59 (IST) 2 Jun 2023
दहावीच्या निकालात फर्स्ट, सेकंड क्लासनुसार टक्क्यांची वर्गवारी पाहा

राज्यातील ५ लाख २६ हजार २१० विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत, ३,३४,०१५ द्वितीय श्रेणीत तर ८५,२१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

11:52 (IST) 2 Jun 2023
दहावी निकालात खाजगी विद्यार्थी व पुनर्परीक्षार्थींच्या यशाचा आढावा, पाहा टक्केवारी

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण ६०.९० टक्के तर खाजगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७४.२५ टक्के इतके आहे

11:50 (IST) 2 Jun 2023
दहावीच्या निकालात दिव्यांग विद्यार्थ्यांना घवघवीत यश, पाहा टक्केवारी

दहावीच्या निकालात दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२. ४९ टक्के असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे

11:47 (IST) 2 Jun 2023
दहावीच्या निकालात मुलींची बाजी; पाहा टक्केवारी

यंदा दहावीत ९५.८७ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.०५ टक्के आहे. बारावीप्रमाणे दहावीतही यंदा मुलींनी बाजी मारली आहे

11:36 (IST) 2 Jun 2023
दहावीच्या निकालाची विभागवार टक्केवारी पाहा! मुंबई, पुणे पडलं मागे

पुणे ९५.६४ टक्के

नागपूर: ९२.०५ टक्के

औरंगाबाद: ९३.२३ टक्के

मुंबई: ९३.६६ टक्के

कोल्हापूर: ९६.७३ टक्के

अमरावती: ९३.२२ टक्के

नाशिक: ९२.२२ टक्के

लातूर: ९२.६७ टक्के

कोकण: ९८.११ टक्के

11:30 (IST) 2 Jun 2023
दहावीच्या निकालाचा टक्का घसरला, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बारावीप्रमाणे दहावीचं निकालाचा टक्काही घसरला आहे. मागील वर्षी महाराष्ट्राचा निकाल ९६. ९४ टक्के लागला होता तर यंदाचा निकाल ९३.८० टक्के लागलेला आहे.

11:19 (IST) 2 Jun 2023
दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के, कोकण विभागाची बाजी

दहावीचा निकाल ९३. ८३ टक्के, कोकण विभागाची बाजी

MSBSHSE 10th Result Live Updates in Marathi

महाराष्ट्र एसएससी बोर्ड निकाल २०२३ लाइव्ह