News Flash

करिअरमंत्र

नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी परीक्षा देऊन तो या तिन्ही दलांतील नोकरीसाठी पात्र ठरू शकतो.

मी बॅचलर ऑफ व्होकेशनल (रिटेल मॅनेजमेंट) च्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला या क्षेत्रात करिअर करता येईल का? मी मास्टर ऑफ व्होकेशनल करावे की एमबीए करावे?
– सुरभी गुजराथी
हा अभ्यासक्रम केल्यावर आपल्याला रिटेल मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, रिटेल बायर, र्मकडायझर अनॅलिस्ट, सप्लाय चेन डिस्ट्रीब्युटर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, वेअरहाऊस मॅनेजर, ब्रँड मॅनेजर, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, इमेज प्रमोटर, र्मकडाइज मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर यांसारख्या संधी मोठय़ा कंपन्यांमध्ये मिळू शकतात. मास्टर ऑफ व्होकेशन अथवा किंवा एमबीए इन रिटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम केल्यावरही अशा संधी मिळू शकतात.
माझ्या भावाने आता विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली आहे. त्याला भूदल, सन्यदल, आणि हवाई दलात करिअर करण्यात रस आहे. त्याने कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घेणे उचित ठरेल?
– प्रशांत पांडेकर
नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडेमी परीक्षा देऊन तो या तिन्ही दलांतील नोकरीसाठी पात्र ठरू शकतो. १०+२ टेक्निकल एन्ट्री स्कीम या योजनेमध्ये अर्ज केल्यास लष्करासाठी आवश्यक ठरणाऱ्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी निवड होऊ शकते. एअर मॅनसाठी होणारी परीक्षा देऊन वायुदलातील विविध पदे त्याला मिळू शकतात. पदवी घेतल्यानंतर कम्बाइन्ड डिफेन्स सíव्हस एक्झामिनेशन देऊन तो तिन्ही दलातील वेगवेगळ्या पदांवर जाऊ शकतो.
मी शारीरिकदृष्टय़ा अपंग असून बी.कॉम उत्तीर्ण आहे. मला नोकरीच्या संधींविषयी माहिती हवी आहे.
– सचिन परदेशी
शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी शासकीय, निमशासकीय सेवांमध्ये साधारणत: ३ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. त्यामुळे या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा तयारीने दिल्यास नोकरीची उत्तम संधी नक्कीच मिळू शकेल.

मी सिव्हिल इंजिनीअिरगच्या शेवटच्या वर्षांला आहे. मला वन क्षेत्रात करिअर करायचे आहे. मला भोपाळ येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या संस्थेच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फॉरेस्ट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. मी या संस्थेच्या अभ्यासक्रमासाठी पात्र आहे का? या अभ्यासक्रमासाठी संस्था प्रवेशपरीक्षा घेते का व कधी? हा अभ्यासक्रम केल्यानंतर कोणत्या संधी मिळतील?
– अस्मिता कांबळे
आपण भोपाळ येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट या संस्थेच्या अभ्यासक्रमासाठी पात्र आहात. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी CAT किंवा XAT या परीक्षेतील गुण ग्रा धरले जातात. त्यामुळे तुम्हाला या परीक्षा द्याव्या लागतील. याखेरीज संस्थेचा अर्ज स्वतंत्ररीत्या भरावा लागेल. वनव्यवस्थापन, संरक्षण, संशोधन, संवर्धन आदी विषयांसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज सातत्याने भासत असते. त्यामुळे हा अभ्यासक्रम केल्यावर वनक्षेत्राशी संबधित विविध क्षेत्रांमध्ये संधी मिळू शकते. संपर्क- iifm.ac.in

मी फिजिओथेरपीच्या शेवटच्या वर्षांला आहे. मला संरक्षण दलात जायचे आहे. मला त्याविषयी मार्गदर्शन करावे.
– अर्जुन म्हाडगूत
तुम्हाला संरक्षण दलात नेमक्या कोणत्या पदावर कार्यरत व्हायचे आहे, हे आधी ठरवावे लागेल. कारण या पदासांठी कम्बाइन्ड डिफेन्स सर्वसि एक्झामिनेशन ही परीक्षा लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. याद्वारे विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते. फिजिओथेरपिस्टच्या नियुक्तीसाठी स्वतंत्र परीक्षा घेतली जात नाही. तथापि, लष्कराला या तज्ज्ञांची गरज सतत भासते. संरक्षण दलातील नियुक्तीच्या जाहिराती ‘रोजगार समाचार’मध्ये प्रसिद्ध होतात. त्याकडे लक्ष ठेवावे.

मी पेट्रोकेमिकल इंजिनीअिरगच्या दुसऱ्या वर्षांला आहे. मला नौदल अधिकारी व्हायचे आहे किंवा नौदलात करिअर करायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल?
– निशिकांत जाधवकर
आपल्याला नौदलामध्ये अधिकारी होण्याची संधी एनडीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मिळू शकते. आपण वयोमर्यादा ओलांडली नसल्यास पूर्ण तयारीनीशी ही परीक्षा द्यावी. र्मचट नेव्हीमध्ये जाण्यासाठी इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिीचे बी.एस्सी नॉटिकल सायन्स, बी.एस्सी मरीन सायन्स हे अभ्यासक्रम करू शकता. मात्र त्यासाठीही तुम्हाला चाळणी परीक्षा द्यावी लागेल.
संपर्क- www.imu.edu.in

मी यशंवतराव मुक्त विद्यापीठामधून बी. कॉम पदवी प्राप्त केली आहे. मात्र मी अकरावी-बारावी केलेले नाही. दहावीनंतर मी आयटीआय- फिटर अभ्यासक्रम पूर्ण केला. मला पोलीस भरती परीक्षा देता येईल का तसेच इतर कोणत्या परीक्षा मला
देता येतील?
– रणजित भाटी
पोलीस भरतीसाठी आवश्यक अर्हता दहावी उत्तीर्ण असल्यास आपण पोलीस भरतीसाठी पात्र ठरू शकता. यशवंतराव मुक्त विद्यापीठाची पदवी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी ग्रा मानली जाते, त्यामुळे आपण नागरी सेवा परीक्षा देऊ शकता. बँकेच्याही परीक्षा देऊ शकता.

मी इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन या विषयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला पदवीनंतर र्मचट नेव्हीमध्ये जायचे आहे. त्यासंबंधी मार्गदर्शन हवे होते.
– अभिजित बावले
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिीमार्फत चालविण्यात येणारे बी.एस्सी नॉटिकल सायन्स किंवा बीटेक इन मरीन इंजिनीअिरग या अभ्यासक्रमांना बारावी या अर्हतेवर प्रवेश दिला जातो. या विषयात एम.टेक अभ्यासक्रम या संस्थेने सध्या तरी सुरू केलेले नाहीत. त्यामुळे आपल्याला सध्या तशी संधी दिसत नाही. तथापि, आपण या संस्थेचे एमबीए इन पोर्ट अ‍ॅण्ड शििपग मॅनेजमेंट किंवा एमबीए इन इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम करून मेरिटाइम क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. या दोन्ही अभ्यासक्रमांना अखिल भारतीय चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.

माझ्या मुलीने राज्यशास्त्रात एम.ए. केले आहे. तिला कोणत्या करिअर संधी मिळू शकतील? या संबंधित कोणत्या परीक्षा आहेत?
– सच्चिदानंद राजपूरकर
राज्यशास्त्र या विषयाशी संबंधित कोणतीही परीक्षा सध्या तरी घेतली जात नाही. तथापि, या विषयात नेट/सेट देऊन अध्यापन क्षेत्राची पूर्व तयारी करता येईल. राज्य आणि केंद्रीय नागरी सेवा परीक्षेची तयारी करता येऊ शकते. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये करिअरच्या संधी मिळू शकतात. मात्र, त्यासाठी एखादा पदविका अभ्यासक्रम करून ठेवल्यास उत्तम.
सुरेश वांदिले
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2016 1:15 am

Web Title: career guidance 4
Next Stories
1 फुलब्राईट नेहरू मास्टर्स फेलोशिप
2 शारीरिक शिक्षणविषयक अभ्यासक्रम
3 नोकरीची संधी
Just Now!
X