-डॉ. नंदू मुलेमुले

मुलांनी स्वतंत्र बुद्धीचं व्हावं, स्वकर्तृत्व गाजवावं तसेच नव्या पिढीला पाठिंबा देणं हेच प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य असतं. त्यांच्या आयुष्याला दिशा देत असताना एखादा क्षण असा येतो की, मुलं स्वत:ची वाट स्वत:च निवडू लागतात. हे नैसर्गिक असलं तरी प्रत्येक वेळी मुलं निर्णय घेताना आईवडिलांना सगळं सांगतातच असं नाही. अशा वेळी त्यांच्या संवेदनशील मनाचे तुटलेले धागे पुन्हा कसे जुळून येतील?

newly married girl loksatta article
इतिश्री : वैचारिक सीमोल्लंघन
world mental health day chaturang article
ऐकावे मनाचे… करावे मनाचेच…
World Hand Wash Day, wash hands,
हात धुता धुता…
Inequality, injustice violence, fear, fearless,
‘भय’भूती: भयशून्य चित्त जेथे
sandha badaltana Do old items expire
सांधा बदलताना : या भवनातील गीत पुराणे?
Borderline Personality Disorder BPD among youth
स्वभाव, विभाव : एकाकीपणातली असुरक्षितता
what is the pink tax that additional price paid by women
स्त्री ‘वि’श्व : ‘गुलाबी करा’चे गूढ
Loksatta chaturang Girlfriend love Family Responsibilities
माझी मैत्रीण : ‘आम्ही मैत्रीवर प्रेम करतो’
Loksatta chaturang life encouraged think Cognitive Science
जिंकावे नि जगावेही: विचारांची सदाबहार फुलबाग

‘‘हॅलो, डॉक्टर शेखर बोलतोय. कोण?’’ मानसतज्ज्ञ शेखरच्या मोबाइलची रिंग वाजू लागली तेव्हा तो गाडी चालवीत होता.
‘‘अरे मैं हितेन बोल रहा हूं। इथे येऊ शकतोस का? एक पैसठ साल की लेडी है। असह्य वेदना होत आहेत तिला.’’ हितेन शहा, प्रसिद्ध ऑन्कोसर्जन. शेखरला आठवलं. शेखरनं गाडी तिकडेच वळवली. हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत त्यानं पहिला मजला गाठला तेव्हा हितेन बाहेर जाण्याच्या तयारीत होता. ‘‘साधनाताई, रूम नंबर सात में। गर्भाशयाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया केलीय. महिना झाला. अजून वेदना कमी होत नाहीएत.’’ थोडक्यात माहिती देऊन तो निघून गेला.

हेही वाचा…तुमचं कार्यालयीन ठिकाण सुरक्षित आहे का?

साधनाताई, गोरा पण उदास, सुरकुतलेला चेहरा. कलप उतरल्यानं फिकट लाल-पिवळे झालेले केस, कृश प्रकृती, डोळ्यांत वेदना. ‘‘नमस्कार, मी डॉ. शेखर, मानसतज्ज्ञ. तुमच्या ओटीपोटातलं दुखणं कमी होत नाहीय त्यासाठी डॉक्टरांची मदत करण्यासाठी आलोय.’’
साधनाताईंनी शेखरकडे काहीशा साशंक नजरेनं पाहिलं. ‘‘पण डॉक्टर माझं दुखणं शस्त्रक्रियेनंतर सुरू झालंय. औषधानं तात्पुरतं कमी होतं, नंतर पुन्हा सुरू होतं.’’

‘‘साधनाताई, तुम्ही चक्क पीएच.डी. आहात? वॉव.’’ केसपेपर पाहत शेखरनं सुरुवात केली. साधनाताई क्षणभर सुखावल्या. ‘‘नवऱ्याची बदली केरळला झाली, मी इथेच. मग जुनी राहिलेली इच्छा पूर्ण केली. तेव्हा सुमित सिंगापूरला शिफ्ट झाला होता.’’ शेखरचा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्यांनी खुलासा केला, ‘‘माझा मुलगा, खासगी कंपनीत असतो.’’
‘‘अरे वा. लग्न झालंय त्याचं की अजून बॅचलर आहे?’’ शेखरनं सहज विचारलं, पण तेवढ्यात साधनाताईंच्या पोटात एक असह्य कळ आली. ‘‘आई गं… डॉक्टर,’’ त्या किंचाळल्या. नर्स पटकन धावत आली. त्यांनी साधनाताईंना बेडवर निजवलं आणि वेदनाशामक गोळी दिली.
‘‘मी नंतर येऊ? तुम्हाला त्रास होत असेल तर?’’
‘‘नाही, थांबा डॉक्टर, आता बरंय,’’ साधनाताई हलकेच उशीला टेकून बसल्या. तरुणपणी आपल्या सुमितसारखाच दिसत असेल हा डॉक्टर, त्यांच्या मनात विचार चमकून गेला.
‘‘आधी कधी दुखलं होतं? आय मीन, शस्त्रक्रियेच्या आधी?’’ साधनाताई सांगताहेत तर विचारून घ्यावं दुखण्याबद्दल, शेखरनं विचार केला.
‘‘वर्षभरापासून अधूनमधून दुखायचं, पण गोळ्या घेतल्यावर थांबायचं. दिवस धावपळीचे होते. सुमित इथला जॉब सोडून सिंगापूरला निघाला होता तेव्हा…,’’ साधनाताईंचा चेहरा सूक्ष्म वेदनेनं चमकल्याचं शेखरनं टिपलं. मुलाचा उल्लेख झाला की त्या अपसेट होतात हे त्याच्या लक्षात आलं.
‘‘आणि पती? सोबत दिसत नाहीत तुमच्या?’’
‘‘ते परवाच गेले केरळला. निवृत्त झाल्यावरही स्वस्थ न बसणारा माणूस. पहिल्यापासून कामात मगभन. त्यांना मानद सल्लागार पदासाठी विनंती केली त्यांच्या कंपनीनं. म्हटलं जा, आणि हा माणूस रुजूही झाला केरळला. बरं आहे, कौटुंबिक कटकटींपासून दूर ठेवतो स्वत:ला. माझ्या डोक्यावर सोडून जातो,’’ साधनाताईंनी सुस्कारा सोडला.

हेही वाचा…स्वसंरक्षणार्थ…

‘‘मला सांगा साधनाताई, झोप नीट होते का तुमची रात्री? सतत विचार येतात का काही?’’
‘‘हाच, परवापर्यंत सारं चांगलं होतं, हे काय दुखणं उद्भवलं,’’ साधनाताईंना पोटाच्या व्याधीपेक्षा दुसरं काही तरी दु:ख आहे याची शेखरला खात्री पटली.
‘‘स्त्रियांना कधी घरच्या समस्यांमधून निवृत्ती नसतेच, नाही? रोजची कामं, शारीरिक व्याधी, त्यात मुलांचे प्रश्न.’’ साधनाताईंचे विषादाचे भाव त्यानं टिपले.

‘‘खरंय डॉक्टर, शरीर व्याधी परवडली, तिला उपचार आहेत. मुलांचे प्रश्न न संपणारे. मुलांचे काय, आम्हाला एकच अपत्य, सुमित. तसा त्याचा काही प्रश्न नव्हता, मागल्या वर्षापर्यंत,’’ साधनाताई सांगावं की नाही या दुविधेत दिसल्या. शेखरनं संभाषण थोडं हलकंफुलकं करण्याचा प्रयत्न केला. मुलं खरं तर आईजवळ जास्त व्यक्त होतात. म्हणजे, मानसशास्त्र तसं सांगतं. एकुलता एक म्हणजे सुमित तुमचा लाडकाच असणार, नाही?’’
‘‘हो ना, एक तर त्याचे बाबा सदैव कामात व्यग्र. तो लहानपणापासून माझ्या सहवासात. खूप चांगला मुलगा. अभ्यासू,’’ साधनाताई हरवल्यासारख्या झाल्या.
‘‘मग बिनसलं कुठे?’’ निश्चित केव्हा याची शेखरनं मनोमन नोंद घेतली, पण उघड काही विचारलं नाही. ‘‘मुलांना कधी तरी स्वतंत्र व्हावंच लागतं ना, आईवडील किती दिवस पुरणार त्यांना?’’

‘‘व्हा स्वतंत्र, पण आईवडिलांना ताप देऊन नका होऊ!’’ साधनाताई अचानक उसळल्या. ‘‘त्यानं वडिलांसारखं इंजिनीयरिंग करावं असं मला वाटत होतं, तेव्हा मेडिकल सोडून तो इंजिनीयर झाला. अंतिम वर्षातच चांगल्या कंपनीत त्याची निवड झाली. उंच, स्मार्ट, हुशार, तरीही मोठ्यांबद्दल आदर बाळगून असलेला, माझ्या शब्दाबाहेर नसलेला मुलगा प्रेमात काय पडतो, भलतेच निर्णय काय घेतो.’’ साधनाताईंच्या पोटात पुन्हा कळ आली.

हेही वाचा…माझी मैत्रीण : ‘रिश्तों का इल्जाम ना दो’

‘‘इथे बेंबीपाशी खूप दुखतंय डॉक्टर, सहन नाही होत. टाके तुटले असतील का?’’
‘‘ते नंतर बघू. आधी तुम्ही शांत पडा. दीर्घ श्वास घ्या,’’ शेखरनं नर्सला आवाज दिला.
‘‘साधनाताई, मी उद्या येऊ का? तुम्हाला बरं वाटल्यावर?’’
‘‘त्रास रोजचाच आहे डॉक्टर. आज बोलावंसं वाटतंय तुमच्याजवळ.’’ तेवढ्यात मोबाइलची रिंग वाजली. ‘‘सॉरी हं, यांचा फोन आहे,’’ साधनाताईंनी फोन घेतला. ‘‘मी बरी आहे. परवा येताय? ठीक. नवीन डॉक्टर आलेत तपासायला.’’
‘‘बोलाल यांच्याशी?’’ असं विचारत साधनाताईंनी फोन शेखरच्या हाती दिला.

‘‘नमस्कार! मी शेखर, न्युरोसायकियाट्रिस्ट.’’ पलीकडून एक वयस्क, शांत आवाज आला, ‘‘डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? सुमितनं एका सिंधी मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय त्यांचं साधनानं खूप टेन्शन घेतलंय. पण त्याचा तिच्या वेदनेशी काही संबंध असेल असं मला वाटत नाही. बघा तुम्ही. यू नो द बेस्ट. बाय.’’

‘‘काय म्हणत होते हे, सुमितबद्दल?’’

त्यानं फोन साधनाताईंना परत केला. साधनाताईंचा चेहरा काळवंडला. ‘‘काय सांगू, मला विचारल्याशिवाय साधा शर्टसुद्धा घ्यायचा नाही विकत, अन् त्या निशाशी सूत जुळवून बसलाय.’’ साधनाताईंचा चेहरा निराशेच्या गर्तेत कोसळल्यासारखा दिसू लागला.

हेही वाचा…सांदीत सापडलेले… : मतभेद

‘‘मुलगी चांगली आहे ना?’’ शेखर सावध अंदाज घेत बोलला.

‘‘हो डॉक्टर, तसाही माझा प्रेमविवाहावर कसला आक्षेप असणार? करा नं, पण अगदी थेट आयुष्याची गाठ बांधेपर्यंत मला कळू देऊ नये? माझी परवानगी घ्यावी असं म्हणत नाहीय, पण विचारावं तरी? माझ्याशिवाय पान हलत नव्हतं त्याचं, इतका सुशील, हुशार मुलगा माझा, अन् काही दिवसांच्या अवधीत तिच्या प्रेमात पागल होऊन गेला?’’

‘‘हे असंच असतं साधनाताई. मुलांनी आपला जोडीदार शोधावा, प्रेमात आकंठ बुडून जावं, हे सुख त्यांना लाभावं म्हणून आपण धडपडतो ना?’’
‘‘प्रेमात आकंठ बुडावं, पण इतकं की त्याला आईला काय वाटेल याचाही विसर पडावा?’’ साधनाताई जवळजवळ कडाडल्या. जणू शेखरच सुमित झाला होता!

‘‘हो, तुमची अपेक्षा चुकीची नाही. पण यथावकाश सांगितलं ना?’’
‘‘केव्हा? दोघांनी मिळून सिंगापूरला जाण्याचं ठरवलं तेव्हा. ‘निशा आणि मी चाललो’ म्हणाला तेव्हा कळलं.’’ साधनाताईंचा स्वर दुखावल्यासारखा झाला.

‘‘अशा गोष्टी मुलांना सांगायला संकोच वाटू शकतो. एनी वे, निशा तुम्हाला कशी वाटली?’’
‘‘ती चांगली आहे हो, पण…’’ साधनाताईंचा स्वर कातरला. ‘‘तिचा बाप, त्या माणसाबद्दल चांगलं बोललं जात नाही. कॉर्पोरेट जगात मोठा माणूस असेल, पण त्याचे व्यवहार सचोटीचे नाहीत असे लोक सांगतात. अशा घराण्याच्या श्रीमंतीला भुलून माझा सालस पोरगा वाहवत गेला, मला कळलंही नाही. पोटचा पोरगा असं परकं करून टाकतो आईला, नुसत्या विचारानं पोटात कळ येते हो डॉक्टर!’’ साधनाताई अचानक थबकल्या.

हेही वाचा…जिंकावे नि जगावेही : तक्रारींचा उपवास!

साधनाताईंच्या पोटातला ताण असा उत्स्फूर्तपणे बाहेर पडला होता. त्यांनीच त्यांचं निदान केलं होतं.

‘‘साधनाताई, माणसाचं पोट हे इतकं संवेदनशील असतं की, ताणतणाव, चिंता यांचा परिणाम मनाइतकाच पोटावर होतो. ज्या नाळेनं सुमित तुमच्या बंधनात होता ती खरी आत्ता तुटली. मुक्त झाली. हे जितकं नैसर्गिक, तितकंच तुम्हाला दु:ख होणं साहजिक. सुमितला तुम्ही जन्म दिला, त्याच्या आयुष्याला दिशा दिली याबद्दल तुमचं कौतुकच. पण निसर्गच मुलांना स्वतंत्र दृष्टी देतो, आपली वाट निवडण्याची बुद्धी देतो हेही खरं. त्यानं कायम आईवडिलांवर विसंबून राहावं हे तुम्हाला तरी आवडेल का? आईवडिलांचं अंतिमत: लक्ष्य काय असतं, तर मुलांनी स्वतंत्र बुद्धीचं व्हावं, स्वकर्तृत्व गाजवावं, हो ना?’’

साधनाताईंच्या मनात समजूतदारपणा झिरपू लागला. तरी त्यांनी प्रतिकार केलाच. ‘‘आणि तिच्या वडिलांचं काय? एका बदमाश माणसाच्या व्यवसायाचा भाग व्हायचं हे कितपत योग्य आहे?’’

‘‘साधनाताई ही पिढी भविष्यातली आहे आणि त्यांची मूल्ये वेगळी आहेत. पूर्वी ज्याला लबाड म्हणत त्याला आज ‘स्ट्रेटजिस्ट’ म्हणतात. कॉर्पोरेट जगातल्या उलाढालींचे ज्ञान आपल्याला नाही. तुम्हाला आहे का? ते ज्ञान घेण्यासाठी तुम्ही सुमितला सक्षम केलं आहे, ते तो वापरल्याशिवाय राहील का? आजची लढाई आजची शस्त्रे परजूनच लढावी लागेल, त्यांच्या हातात तुमच्या काळातली शस्त्रे देण्यात शहाणपणा आहे का?’’

साधनाताई विचार करू लागल्या. शेखरनं काही काळ जाऊ दिला.

‘‘सुमितनं आपल्या जोडीदाराची निवड स्वत: केली आहे. त्याच्या निवडीचं स्वागत केलं पाहिजं. त्याला निवड करता येत नाही असं म्हणणं म्हणजे आपण त्याला सक्षम केलं नाही असं म्हणणं होईल. नवी पिढी जे करते त्याला पाठिंबा देणं, त्यात दुर्दैवानं अपयश आलं तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं एवढंच तुमच्या हाती आहे.’’

‘‘सुमितनं एक नवी झेप घेतली आहे, याचा तुम्हाला अभिमान आहे. तो त्याच्या काळजीपोटी झाकोळला आहे एवढंच. सुमितच्या निर्णयाचं स्वागत करा. तुमच्या साऱ्या कळा शांत होऊन जातील.’’

हेही वाचा…‘भय’भूती : भयकातर हिरवे हुंकार

साधनाताईंचा चेहरा खरंच शांत झाला होता. एका आईचे तटातट तुटलेले काळजाचे धागे पुन्हा जुळू लागतील याची शेखरला खात्री होती.

nmmulmule@gmail.com