पंजाबचे आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांना कॅनडात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. रविवारी कॅनडातील ओटावा विमानतळावर हा प्रकार घडला. आप आमदार कुलतारसिंग रंधवा आणि अमरजीतसिंग संदोआ यांना ओटावा विमानतळावर ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना पुन्हा भारतात पाठवण्यात आले. परंतु, कॅनडाकडून हा प्रकार का करण्यात आला हे अद्याप समजलेले नाही.

कुलतारसिंग रंधवा हे कोटकपुरा आणि अमरजित रोपड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही आमदार हे सुटीसाठी कॅनडाला गेले होते. परंतु, रविवारी त्यांना ओटावा विमानतळावर उतरवण्यात आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दोन्ही आमदारांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिले. पण त्यांना पुन्हा भारतात पाठवण्यात आले. दरम्यान, दोन्ही आमदार नेहमी चर्चेत असतात. अमरजित यांच्यावर मारहाणीचे प्रकरण सुरू आहे. त्याचबरोबर त्यांचे नाव गुंडांबरोबरही जोडले जाते.