26 November 2020

News Flash

सलग तिसऱ्या दिवशी देशात ६० हजारांहून कमी रुग्ण

देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा ७६,५१,१०७ इतका झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

देशात २४ तासांच्या कालावधीत करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ६० हजारांहून कमी राहिली. आता देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा ७६,५१,१०७ इतका झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

गेल्या २४ तासांत ५४०४४ जणांना करोनाचा संसर्ग झाला. याच कालावधीत ७१७ जण करोनाने मृत्युमुखी पडल्यामुळे करोना बळींची संख्या १ लाख १५ हजार ९१४ इतकी झाली आहे. याच वेळी, ६७,९५,१०३ आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ८८.८१ टक्के इतके आहे.

कोविड-१९ चा मृत्युदर घसरून १.५१ टक्क्यांवर आला आहे. सलग पाचव्या दिवशी करोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या ८ लाखांपेक्षा कमी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 12:20 am

Web Title: for the third day in a row less than 60000 patients in the country abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 कांदा आयातीवरील निर्बंध शिथिल
2 केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस
3 निवडणूक खर्चाच्या मर्यादेचा पुनर्विचार
Just Now!
X