26 September 2020

News Flash

‘वाईफ स्वापिंग’ला नकार देणाऱ्या पत्नीवर मित्रांच्या मदतीने केला सामूहिक बलात्कार

'तू वाईफ स्वापिंगसाठी तयार झालीस तर मलाही माझ्या मित्रांच्या पत्नींबरोबर शरीरसंबंध ठेवता येतील'

सामूहिक बलात्कार

वाईफ स्वापिंगसाठी (पत्नी आपआपसात बदलणे) पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिच्यावर बलात्कार करुन त्याचा व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना दिल्लीमध्ये समोर आली आहे. आरोपीने आपल्या पत्नीवर बलात्कार करुन त्याचे व्हिडिओ शुटींग करत तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांनाही आपल्या पत्नीवर बलात्कार करायला सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

पती-पत्नीच्या पवित्र नात्याला कलंक लावणार ही घटना पीडित महिलेनेच पोलिसांना सांगितली आहे. दिल्लीतील या महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार तिच्या पतीला दारूचे व्यसन आहे. ‘तो नेहमी माझ्यावर त्याच्या मित्रांबरोबर शरीरसंबंध बनवण्यासाठी दबाव टाकायचा. तू असे केले तर मलाही माझ्या मित्रांच्या पत्नींबरोबर शरीरसंबंध ठेवता येईल असं तो मला सांगायचा,’ असा अरोप या महिलेने केला आहे. मात्र या महिलेने आपल्या पतीच्या या विचित्र मागणीचा कायम विरोध केला. ‘मी असल्या गोष्टींना कधीच तयार होणार नाही,’ असं तिने स्पष्टपणे आपल्या पतीला सांगितले.

याच विषयावरुन पती पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. दारुच्या नशेत घरी आल्यानंतर पती मला मारहाण करायचा. एक दिवस असाच दारुच्या नशेत घरी आल्यानंतर या व्यक्तीने वाईफ स्वापिंगला तयार होण्यासाठी पत्नीबरोबर वाद घातला. पत्नीने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला. या सर्व प्रकाराचे त्याने व्हिडिओ शूटींग केले. त्यानंतर तू वाईफ स्वापिंगसाठी तयार झाली नाहीस तर मी हा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी त्याने आपल्या पत्नीला दिली. पत्नीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पतीने काही मित्रांनाही पत्नीवर बलात्कार करण्यास सांगितले. ‘माझ्या पतीने मला एका खोलीमध्ये कोंडले. त्यानंतर काही वेळाने त्याचे दोन मित्र त्या खोलीत आले आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. अनैसर्गिक कृत्य केले,’ असे या महिलेने तक्रारीमध्ये नमूद केले आहे.

या महिलेच्या लग्नाला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या महिलेने पती आणि त्याच्या दोन मित्रांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 10:20 am

Web Title: husband gang rape wife in delhi after she refuses wife swapping idea scsg 91
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 ‘नासा’चाही फोटो काढण्याचा प्रयत्न फसला?; विक्रम लँडरचे काय झाले? प्रवक्ते म्हणतात…
3 परदेश दौऱ्यावर निघालेल्या मोदींना राहुल गांधींचा मंदीवरून सवाल, म्हणाले…
Just Now!
X