News Flash

ह्युंडईची भन्नाट ऑफर ! नाव सुचवा आणि कार जिंका

ह्युंडईच्या नव्या कारचं नाव काय असणार? खुद्द ह्युंडई कंपनीलाच हा प्रश्न पडला आहे.

ह्युंडईच्या नव्या कारचं नाव काय असणार? खुद्द ह्युंडई कंपनीलाच हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे कारसाठी नाव सुचवा आणि नवी कोरी कार जिंका अशी भन्नाट ऑफर कंपनीने आणली आहे.

ह्युंडई लवकरच त्यांची लोकप्रिय कार सॅन्ट्रो नव्या रुपामध्ये आणणार आहे. या कारसाठी नाव ग्राहकांनीच नाव सुचवावं असं अनोखं अभियान कंपनीकडून सुरू करण्यात आलं आहे. HyundaiNaamkaran.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्हीही यामध्ये सहभागी होऊ शकतात. संकेतस्थळावर गेल्यावर एएच2 सॅन्ट्रो (कोडनेम) या गाडीसाठी तुम्हाला जे नाव सुचवायचं असेल ते तुम्ही सुचवू शकतात. त्यानंतर सर्वाधिक मतं ज्या नावाला पडतील त्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल, आणि एका लकी विजेत्याला तिच कार मोफत दिली जाईल.

नाव सुचवण्याची प्रक्रिया संकेतस्थळावर सुरू असून सॅन्ट्रो या नावालाच अधिकांश ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. दोन लाखांहून जास्त जणांनी सॅन्ट्रोलात आपली पसंती दर्शवली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर आय-5, तिसऱ्या क्रमांकावर स्प्लॅश आणि चौथ्या क्रमांकावर सानियॉन हे नाव आहे. त्यामुळे सॅन्ट्रो या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

कंपनीच्या या कारची 10 ऑक्टोबरपासून आगाऊ नोंदणी सुरू होणार असून 23 ऑक्टोबरला ही कार लॉन्च होणार आहे. या नव्या कारची किंमत साडेतीन ते साडेचार लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात मारुती सुझूकी सिलेरियो, वॅगनआर, टाटा टियागो आणि रेनॉ क्विड 1.0 या गाड्यांना ह्युंडईच्या या नव्या कारकडून टक्कर मिळू शकते. या गाडीबाबत कंपनीकडून अन्य माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या कारच्या अंतर्गत बाजूवर विशेष लक्ष देण्यात आलं असल्याची माहिती आहे. याशिवाय टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम हे बाजारातील नवं फिचरही आहे. कारमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. तसंच कंपनीची AMT ट्रांसमिशन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असलेली ही भारतातील पहिलीच कार असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 1:43 pm

Web Title: hyundais upcoming hatchback naming contest
Next Stories
1 VIDEO : एटीएममधून मोदकाचा प्रसाद, पुणेकराचा भन्नाट शोध
2 चॅटिंग होणार आणखी सोपं, व्हॉट्स अॅपचे दोन नवे फिचर
3 ८वी पास आमदारांचे वार्षिक उत्पन्न ९० लाख
Just Now!
X